Saturday, July 27, 2024

Latest Posts

पाचगणीमध्ये बिलीमोरया शाळेच्या पटांगणावर पार पडला पॅराग्लायडिंग स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर(Mahabaleshwar) जवळील पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग(Paragliding) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर(Mahabaleshwar)जवळील पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग(Paragliding)स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. टाईम महाराष्ट्र’ (Time Maharashtra), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशन यांच्या तर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान पाचगणीच्या निसर्गामध्ये ही स्पर्धा पार पडली.या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा साठवा वाढदिवस ९ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून टाईम महाराष्ट्र,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशनने महाबळेश्वरमधील पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग प्री वर्ल्ड कप २०२४ (Paragliding Pre World Cup) या स्पर्धेचे आयोजन केले होते. वेगवेगळ्या देशातील सुमारे १५० पायलट या स्पर्धेत सहभागी झाले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा १८ फेब्रुवारी रोजी पाचगणीमधील बिलीमोरिया शाळेच्या पटांगणावर पार पडला. यावेळी ‘स्ट्रॉबेरी विथ सीएम’ (Strawberry with CM) या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच पॅराग्लायडिंग स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना सन्मानित केले.कार्यक्रमावेळी काही पॅराग्लायडर्स आकाशात पॅराग्लायडिंग करताना दिसून आले. बिली मोरया शाळेच्या मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाल्यानंतर बिलिमोरिया शाळेच्या विश्वस्तांकडून स्वागत आणि लहान मुलांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच या सोहळ्यासाठी ‘प्रोजेक्ट देव डी बँड’ चे आयोजन करण्यात आले होते. सुरांच्या मैफिलीत बक्षीस वितरण सोहळा पार पडला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.या कार्यक्रमाला साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यशानी नागराजन, जीवन गलांडे, कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे आणि महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पॅराग्लायडिंग विषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पॅराग्लायडिंग हा एक साहसी खेळ आहे. हा खेळ खेळणं साहसी लोकांचे काम आहे. पॅराग्लायडिंग करताना वर गेल्यानंतर माणसाच्या क्षमतेची कसोटी लागते.पॅराग्लायडिंग प्री वर्ल्ड कप २०२४ या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या १२ देशातून आलेल्या खेळाडूंचे महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. लवकरच या पॅराग्लायडिंग या खेळाचा वर्ल्ड कप महाराष्ट्र्रामध्ये खेळवला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

Time Maharashtra आयोजित Strawberry With CM कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

स्ट्रॉबेरी पिकाला अनुदान देण्यासाठी शासन प्रयत्नशील – CM EKNATH SHINDE

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss