टाईम महाराष्ट्र’ (Time Maharashtra), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशन यांच्याकडून एका साहसी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १२ फेब्रुवारी पासून सुरु झालेलया पॅराग्लायडिंगच्या स्पर्धेचा सराव स्पर्धकांनी पूर्ण करून १७ फेब्रुवारी रोजी पॅराग्लायडर्सने आकाशात उंच भरारी घेत स्पर्धेचा आनंद घेतला आणि एक विक्रम आपल्या नावावर कोरला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘टाईम महाराष्ट्र’ (Time Maharashtra), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशन यांच्याकडून पॅराग्लायडिंग साहसी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही थरारक स्पर्धा महाराष्ट्रातील ‘पॅराग्लायडिंगची पंढरी’ मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर (Mahabaleshwar) जवळच्या पाचगणी या ठिकाणी संपन्न झाली.
सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथील बिलीमोरिया शाळेच्या सभागृहात ‘स्ट्रॉबेरी विथ सीएम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्ट्रॉबेरी उत्पादकांशी संवाद साधला. तसेच, पॅराग्लायडिंग प्री -वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना सन्मानित केले. पाचगणी येथील बिलीमोरिया शाळेच्या सभागृहात ‘स्ट्रॉबेरी विथ सीएम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी उत्पन्न घेतले जाते. या उत्पन्नावरच येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्ट्रॉबेरी पिकाला अनुदान देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा केली जाईल, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
टाईम महाराष्ट्र आयोजित पॅराग्लायडींग प्री वर्ल्ड कप स्पर्धा २०२४ बक्षीस वितरण समारंभाच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पॅराग्लायडींग करणे हे साहसी व आव्हानात्मक असून जमिनीवर उतरणे तितकेच महत्त्वाचे आहे. दऱ्या खोऱ्यांनी व निसर्गसंपदेने नटलेल्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत या स्पर्धेचे चांगले आयोजन केले आहे. पॅराग्लायडींग या खेळाची जागतिक स्तरावरील स्पर्धा लवकरच महाराष्ट्रात घेतली जाईल, असे प्रतिपादन केले. पॅराग्लायडींग या साहसी व आव्हानात्मक खेळाची जागतिक स्पर्धा घेतली जाईल, या स्पर्धेसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, टाईम महाराष्ट्रचे मुख्य संपादक राजेश कोचरेकर, टाईम महाराष्ट्रचे संचालक अमेय बेर्डे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
हे ही वाचा:
Time Maharashtra आयोजित Strawberry With CM कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी साधला शेतकऱ्यांशी संवाद CM EKNATH SHINDE यांच्या उपस्थितीत रंगणार महापॅराग्लायडिंग स्पर्धेचा बक्षीस समारंभ