Saturday, March 2, 2024

Latest Posts

मनोज जरांगेच्या सभेपूर्वी बीडमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजकीय वर्तुळामध्ये अनेक वाद सुरु आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजकीय वर्तुळामध्ये अनेक वाद सुरु आहेत. आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असणारा याची घोषणा मनोज जरांगे हे आज बीड शहरातून सभेत करणार आहेत. त्यामुळे बीड शहरामध्ये कालपासून सभेमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या सभेकडे राज्यच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पण मनोज जरांगे यांच्या सभेपूर्वी एका मराठा बांधवाने आत्महत्या केली आहे. मधुकर खंडेराव शिंगण (वय ५०) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

बीड शहरात मनोज जरांगे यांच्या सभेची जोरात तयारी चालू आहे.तर दुसरीकडे बीड शहरातील बार्शी नाका परिसरामध्ये राहणाऱ्या मधुकर शिंगण यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तसेच आत्महत्या करण्याआधी मयत मधुकर यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी लिहिले आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, राम राम… मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. मी मराठा आरक्षणासाठी जीवन संपवत आहे. मनोज जरांगे पाटील हे चांगलं काम करत आहेत. त्यांनी माझ्या कुटुंबाला भेट द्यावी, अशी त्यानी चिट्ठीमध्ये लिहिले आहे. मधुकर शिंगण यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याआधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केली आहे. याआधी सुद्धा आरक्षणाच्या मागणीवरून धाराशिव मधील एका २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक तरुणांनी आपले जीवन संपवले आहे. आरक्षणाची लढाई सुरु असताना दुसरीकडे तरुण आरक्षणाच्या मागणीवरून अनेकांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करू नये असे आव्हान मनोज जरांगे यांनी केले होते. त्यांनी प्रत्येक सभेमध्ये तरुणांना आव्हान केले आहे. आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे तरुणांनी आत्महत्या करू नये असे मनोज जरांगे म्हणाले.

हे ही वाचा:

MAHARASHTRA: पुरे झाली मन की बात, आता हवी जन की बात…AMOL KOLHE यांचे जनतेला आवाहन

राज्यभरात थंडीची लाट, पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss