Saturday, March 2, 2024

Latest Posts

बार्शी-धाराशिव मार्गावर भीषण अपघात, अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू

सोलापूरमधील बार्शी-धाराशिव मार्गावरील तांदुळवाडीमध्ये काल एका एसटी बस आणि दुचाकींचा अपघात झाला.

सोलापूरमधील बार्शी-धाराशिव मार्गावरील तांदुळवाडीमध्ये काल एका एसटी बस आणि दुचाकींचा अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये ३ तरुणांनचा जागीच मृत्यू झाला आहे. घडलेल्या या अपघातामध्ये धाराशिवमधील ३ तरुणांचा मृत्यू झाला असून तरुण गाडी खाली चिरडले गेले.

बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे झालेल्या अपघातामध्ये ३ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. कार्तिक यादव, ओंकार पवार, ओम आतकरे अशी या तीन तरुण मुलांची नावे आहेत. हे तिघेही धाराशिवचे रहिवासी होते. तिघे जण धाराशिव कडून बार्शीकडे जाण्यासाठी निघाले होते. यावेळी पुण्याहून आलेल्या एसटी बस आणि दुचाकींचा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. हे तिघेही तरुण गाडी खाली अडकले गेले. या अपघातामध्ये एका तरुणाचे शीर हे शरीरापासून वेगळे झाले तर दोघे जण ५० किलोमीटर पर्यंत फरफटत गेले. त्यातच तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच तांदुळवाडी ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. ग्रामस्थांनी बसमधील काही जखमी नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच आता जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे ही वाचा:

LPG सिलेंडरच्या दरात घसरण, ‘या’ ग्राहकांना मिळणार ४० रुपयांची सूट

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss