Sunday, May 19, 2024

Latest Posts

विनयभंगानंतर आता बलात्कारासाठी महिला तयार… आव्हाडांच्या पत्नीचा खळबळजनक दावा

ऋता आव्हाड / सामंत (Rita Awad / Samant) यांनी देखील एक खबळजनक दावा केला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं विनयभंगानंतर आता बलात्कारासाठी महिला तयार करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ठाण्यातील मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड (NCP leader and MLA Jitendra Awad from Mumbra in Thane) यांच्यावर काही दिवसांपूर्वी विनयभंगा (molestation) चा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी काल एक ट्विट (Tweet) केलं होत ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होत कि विनयभंगाचा डाव फसल्यानंतर आता बलात्काराची (rape) तयारी सुरु, अशा आशयाचं ट्विट केलं होत. त्यानंतर आता त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड / सामंत (Rita Awad / Samant) यांनी देखील एक खबळजनक दावा केला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं विनयभंगानंतर आता बलात्कारासाठी महिला तयार करण्यात आल्या आहेत.

मुंब्रा (Mumbra) येथील पुलाच्या अनावरणाच्या (Unveiling of the bridge) वेळी रिदा राशीद (Rida Rashid) नामक महिलेने जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी,” विनयभंगाचा कट फासल्यामुळे काही दिवसांपासून बलात्काराची तयारी सुरु केली आहे. विनयभंगामध्ये नाट्यपूर्ण भूमिका घेणाऱ्या आता या कटातही आघाडीवर आहेत. आज त्या मंत्रालयासमोर गाडीत बसल्याचा विडिओ आहे, मग त्या कोणाला भेटल्या अशा भेटल्या अशा चर्चा सुरु आहेत’, अशा आशयाचं एक ट्विट केलं होत. त्याचबरोबर त्यांनी एका महिलेचा गाडीत बसलेला विडिओ सुद्धा पोस्ट केला आहे.

त्यानंतर, आता त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड / सामंत यांनी देखील अशाच आशयाचं एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे कि,”मला आत्ताच सूत्रांकडून कळलं की ३५४ नंतर, ३७६ ( बलात्कार) चा आरोप करण्यासाठी महीला तयार करण्याचा घाट घातला जात आहे. खात्रीलायक व्यक्तिने हे सांगितलं आहे. @Dev_Fadnavis.” त्याचबरोबर त्यानी या ट्विट मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister of the state Devendra Fadnavis) यांना देखील टॅग केले आहे.

ऋता आव्हाड / सामंत यांच्या या खळबळजनक ट्विटमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात नवीन चर्चाना उधाण आला आहे. आता हे राजकारण कोणतं वळण घेत हे पाहून महत्वाचं आहे.

हे ही वाचा:

ऑस्करच्या टॉप १० लिस्टमध्ये Jr. NTR चा लवकरच होणार समावेश, प्रसिद्ध मासिकाने वर्तवली शक्यता

मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथांना पायघड्या !, नाना पटोल

ठाण्यात दुर्घटना!, मेट्रो ४ च्या लोखंडी गर्डनची प्लेट कोसळून महिलेचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss