Monday, February 26, 2024

Latest Posts

Thane: दुरुस्तीमुळे बदलापूरचा पूल वाहतुकीसाठी राहणार बंद

ठाणे जिल्ह्यातील (Thane District) बदलापूर (Badlapur) शहरालगतच्या कल्याण (Kalyan), मुरबाड (Murbad) तालुका आणि कल्याण अहमदनगर (Kalyan-Ahmednagar) राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा उल्हास नदीवरील (Ulhas River) वालिवली पूल पुढील महिनाभर एमआयडीसीकडून दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ४४ वर्षे जुन्या पुलाची सहा कोटी खर्च करून दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पुढील महिनाभर वाहतूक विभागाच्या नियोजनानुसार पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. या काळात मात्र अंतर्गत रस्त्यावर वाहनचालकांना कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कल्याण, मुरबाड तालुक्यांच्या आणि बदलापूर शहराच्या वेशीवरील अनेक गावांतील नागरिक रेल्वे प्रवासासाठी बदलापूर रेल्वे स्थानकाचा वापर करतात. रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना रोज घरी पोहचण्यासाठी बदलापूर शहरातील एरंजाड ते वालिवली या मार्गाने प्रवास करावा लागतो. तसेच, मुरबाड आणि कल्याण-अहमदनगर (Kalyan-Ahmednagar) राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी बदलापूर शहराच्या बाह्य भागातून वालिवलीमार्गे प्रवास सोयीचा ठरतो. यासाठी उल्हास नदीवरील वलिवली पूल नागरिकांना ओलांडावा लागतो. त्यामुळे कोंडीमुक्त (Traffic Free) आणि वेळेची बचत करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक या पुलाचा वापर करतात.

मागील काही वर्षांत वालिवली पुलाची अवस्था खराब झाल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात होती. याच कारणामुळे या पुलाच्या डागडुजीची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या या पुलाची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचा निर्णय एमआयडीसी प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार या पुलाची देखभाल, दुरुस्ती, फुटपाथ आणि पुराच्या आरसीसी संरचना सुधारणा तसेच पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. या पुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी अंदाजे सहा कोटींचा खर्च येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, पुढील ३० दिवस पुलावरची वाहतूक बंद राहणार आहे. म्हणून, वाहन चालकांना बदलापूर गाव, समर्थ चौक, रेल्वे स्टेशन परिसरातून प्रवास करावा लागणार आहे. तसेच, वालिवलीहून एरंजाडकडे जाणाऱ्या वाहनांना वडवली गणेश चौक, मांजरी हेंद्रेपाडाहून बॅरेज चौकाकडे जाता येणार आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss