Sunday, May 5, 2024

Latest Posts

Dr. Shrikant Shinde Live: दहा वर्ष प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची

कल्याण मतदार लोकसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. या सर्व कामांचा सविस्तर लेखाजोखा असलेल्या ‘विकासदशक- दहा वर्ष प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची’. या कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवार २१ एप्रिल रोजी सावित्रीबाई फुले नाट्यगृहात हा कर्यक्रम पार पडत आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण तसेच स्थानिक भाजपा, राष्ट्रवादी, कांग्रेस, रिपाई, सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित आहेत.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबोधित केले. यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण मतदारसंघातील केलेल्या विकास कार्याविषयीची माहिती उपस्थितांना दिली श्रीकांत शिंदे यांनी दहा वर्षांमध्ये केलेल्या कार्याची आणि कल्याण शहराच्या समृद्धीविषयी असलेला अहवाल सांगितला. रेल्वेने केलेली प्रगती, कल्याण शहरातील रस्त्यांचे काम, विद्यार्थ्यांचा समस्या याबाबतच्या समस्यांवर काढलेला तोडग्याबद्दल श्रीकांत शिंदे यांनी अहवाल सादर केला. यावेळी उपस्थित नागरिकांसमोर गेल्या दहा वर्षात लोकसभेत केलेल्या कामांचे मुख्यमंत्री महोदय आणि जनतेसमोर सादरीकरण करत कामांची सखोल माहितीही दिली. देशात रेल्वेचे सर्वाधिक काम २०१४ ते २०२४ या १० वर्षात झाले असून कल्याण लोकसभेतही मोठ्या प्रमाणात कामे झाल्याचे यावेळी सांगितले. पाचवी सहावी लाईन, कल्याण स्टेशन रिमॉडेलिंग, सरकते जिने, होम प्लॅटफॉर्म अशा अनेक सुविधा देण्यासह रस्ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी पक्क्या रस्त्यांचे जाळे तयार केल्याचे यावेळी सांगितले. रिंग रोड, विठ्ठलवाडी कल्याण उन्नत महामार्ग मोठागाव माणकोली पूल, ऐरोली काटई फ्री वे, तळोजा मेट्रो असे अनेक गेमचेंजर प्रकल्प कल्याण लोकसभेत मागील १० वर्षात झाले, अशी माहिती यावेळी दिली. आरोग्य सुविधेतही कल्याण लोकसभेत सर्वोत्तम सुविधा दिल्याचे यावेळी सांगितले. उल्हासनगरमधील मोफत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज, शासकीय रुग्णालयांमध्ये आधुनिक सुविधा पुरवणे अशी कामे केल्याची माहिती यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

हे ही वाचा:

अभिषेक शर्माने उडवला दिल्लीच्या बॉलर्सचा धुव्वा

उद्धव ठाकरेंचा Amit Shah आणि PM Modi यांच्यावर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss