Saturday, May 4, 2024

Latest Posts

उद्धव ठाकरेंचा Amit Shah आणि PM Modi यांच्यावर हल्लाबोल

सध्या देशभरात निवडणूक चालू आहे. उमेदवारदेखील आपल्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत. आज सकाळी शिवसेना उद्धव ठाकरे चे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरती पत्रकार परिषद घेतली. नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपल्या गटाचे मशाल गीत लाँच केले आहे. याच गीतावरून उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे.

सध्या देशभरात निवडणूक चालू आहे. उमेदवारदेखील आपल्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत. आज सकाळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपल्या गटाचे मशाल गीत लाँच केले आहे. याच गीतावरून उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये निवडणूक आयोगाने मशाल गीतातील जय भवानी हा शब्द काढण्यास सांगितले आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाची नोटीस फेटाळून लावत कोणत्याही परिस्थितीत आम्ही तो शब्द हटवणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. उद्धव पुढे म्हणाले, आज घोषणेतील ‘जय भवानी’ शब्द तुम्ही काढायला लावताय, उद्या ‘जय शिवाजी’ काढायला लावाल. अशी हुकूमशाही पद्धत आम्ही स्वीकारणार नाही, आम्ही याच विरोधात लढत आहोत म्हणून, कुठल्याही परिस्थितीत आम्ही ‘जय भवानी’ हा शब्द गीतातून काढणार नाही’

उद्धव ठाकरे असेही म्हणाले की, जर आमच्यावर कारवाई करायची असेल तर आधी मोदी आणि अमित शहांवर कारवाई करावी लागेल. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला थेट आव्हान केलं आहे. मध्यप्रदेश निवडणुकीच्या वेळेस मोदी यांनी बजरंगबलीच्या नावावर मत द्या असा वक्तव्य केलं होत. याशिवाय अमित शाह यांनी आम्हाला मत दिल तर रामल्लाचं मोफत दर्शन देऊ असंही सांगितलं होत. मोदी आणि शाह यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितलं आहे. निवडणुकीमध्ये धर्माच्या नावावर प्रचार करण जर चुकीचं आहे तर मोदी आणि शाह हिंदुत्वाचा प्रचार करताना त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवलतदेखील ठाकरेंनी केला. जर यावर निवडणूक आयोगाचं उत्तर आलं नाही तर नियम बदलले असं आम्ही समजून आमच्या गीतात बदल करणार नाही.

याचसोबत, तुळजा भवानी हे महाराष्ट्राचं कुलदैवत असून तुळजा भवानीने महाराजांना दिलेली तलवारीचा प्रसंग आमच्या मनात कोरला आहे. म्हणून जय भवानी, जय शिवाजी हि घोषणा महाराष्ट्राच्या जनतेच्या मना-मनात आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या कुलदेवतेचा अपमान केल्याचा आरोप केल्यास निवडणूक आयोगाकडे याचं उत्तर आहे काय, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

हे ही वाचा:

कर्नाटकातील धक्कादायक घटना: ‘ते दोघे’, ‘खून’ आणि ‘धर्म’

उन्हाळ्यात कोंड्याने वैतागलात? मग ‘हा’ उपाय नक्की करा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss