spot_img
Wednesday, February 21, 2024
spot_img

Latest Posts

ठाणे जिल्यात महावितरणाच्या या भागांमध्ये असणार वीजपुरवठा बंद

महापारेषणच्या पडघा ते मोहने या अति उच्च दाब वाहिनीवर आज सकाळी ७ ते दुपारी १ च्या दरम्यान अत्यंत तातडीचे देखभाल- दुरुस्तीचे कामकारण्यात येणार आहे.

महापारेषणच्या पडघा ते मोहने या अति उच्च दाब वाहिनीवर आज सकाळी ७ ते दुपारी १ च्या दरम्यान अत्यंत तातडीचे देखभाल- दुरुस्तीचे कामकारण्यात येणार आहे. त्यामुळे महावितरणच्या काही भागांमध्ये या वाहिनीवरून वीजपुरवठा पुरवल्या जाणाऱ्या ठिकाणी वीजपुरवठा बंद राहणार आहे. संबंधित ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. यामध्ये कल्याण पश्चिमेतील संदीप हॉटेल, सिनेमॅक्स परिसर, बिर्ला कॉलेज रोड, सह्याद्री नगर, उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) परिसर, योगीधाम, गौरीपाडा आणि शहाड भागाचा वीजपुरवठा बंद असणार आहे.

उन्हाळयामुळे आणि वाढत्या तापमानामुळे नागरिकांना मोठा फाटा सहन करावा लागणार आहे. परंतु दुपारी १ वाजेपर्यत लाईट येईल असेही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. उल्हासनगर भागामधील मोहन सबर्बिया, मुरलीधर नगर, केमीकल झोन, वडळगाव, जसानी, लालचक्की, स्टेशनरोड, भाजी मार्केट, मातोश्रीनगर, जुने मुनिसिपल कौन्सिल, मोरीवली व चिखलोली एमआयडीसी, आयटीआय, अंबरनाथ पाणीपुरवठा, लालचक्की मराठा सेक्शन, ओटी सेक्शन, कृष्णानगर, झेडपी हिल, मिरची वाडी, दीपकनगर, नवरे पार्क, ईश्वर रेसिडेन्सी, मुरलीधरनगर, गणेशनगर, नवीन भेंडीपाडा, भास्करनगर, कामगार पुतळा, बुवापाडा, घाडगेनगर, खुंटवली, बालाजीनगर, शिवलींगनगर, न्यु कॉलनी, मातोश्रीनगर, मोहन फेज 1, 2 व 4, विठ्ठल मंदिर, अष्टविनायक कॉलनी, स्वामीनगर, लक्ष्मीनगर, कैलासनगर, पनवेलकर ग्रीन सिटी, शिवाजीनगर या भागांमध्ये वीजपुरवठा सकाळी ७ ते दुपारी १ पर्यत खंडित असणार आहे.

त्याचबरोबर उल्हासनगरमधील दुसऱ्या भागामध्ये खेमानी, पंजाबी कॉलनी, सुभाषनगर, आजादनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिरा चौक, सेंट्रल हॉस्पिटल, फॉलोअर लाईन, डालडा डेपो, प्रेस बाजार, नेवी कॉलनी, गजानन मार्केट, सीरू चौक, नेहरू चौक, कामगार हॉस्पिटल, बेफिकरी चौक, अवतराम चौक, गरीबनगर, सोनार गल्ली, फर्निचर मार्केट, मयूर हॉटेल, जुना ओटी, झुलेलाल मंदिर, बरॅक ६२८, दुर्गामाता मंदिर, रमाबाईनगर, भैय्यासाहेबनगर, हनुमाननगर, आजादनगर, राणा ट्रेडिंग भाग, महादेव कंपाऊंड, गणेश कंपाऊंड, अग्रवाल कंपाऊंड या ठिकाणी वीजपुरवठा बंद असणार आहे. या ठिकाणी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यत देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे म्हणून वीजपुरवठा बंद असणार आहे.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss