Tuesday, April 23, 2024

Latest Posts

Ganpat Gaikwad यांना पहाटेच उल्हासनगर चोपडा कोर्टात केले हजर, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

भाजप आमदार गणपत गायकवाड यांना न्यायलयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. गायकवाड यांच्यासह ५ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. गणपत गायकवाड यांना आज पहाटेच उल्हासनगर चोपडा कोर्टात हजर करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवली शहरात मोठा राजकीय राडा झाला होता. उल्हासनगरमधून (UlhasNagar Crime News) गुन्हेगारीची एक मोठी बातमी समोर आली होती. भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून गोळीबार करण्यात आला होता. हा गोळीबार शिंदे गटाच्या (Shinde Group) कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर करण्यात आला होता. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ ही उडाली होती. तर भाजप आमदार गणपत गायकवाड यांना न्यायलयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. गायकवाड यांच्यासह ५ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. गणपत गायकवाड यांना आज पहाटेच उल्हासनगर चोपडा कोर्टात हजर करण्यात आले.

सामान्यत: कोर्टाचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू होते. मात्र गायकवाड यांच्या या सुनावणीसाठी आज सकाळी ९ वाजता कोर्टाचे कामकाज सुरू करण्यात आले. तर सुरक्षेच्या हेतूने गायकवाड यांना आज पहाटेच त्यांना न्यायलयात आणण्यात आले.गोळीबारानंतर गणपत गायकवाड व इतर आरोपी आजपर्यंत पोलीस कोठडीत होते. आज सकाळी त्यांना उल्हासनगर येथील न्यायलयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायलयाने गायकवाड व इतर आरोपींना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी असा युक्तिवाद केला की ११ दिवसांची कोठडी मिळाली, आणखी २ दिवसांची कोठडी मिळवण्यासाठी पोलिसांनी युक्तिवाद केला. त्यानतर आरोपींच्या वकिलांनीही युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश निकम यांनी गायकवाड व इतर आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

 

या सुनावणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. न्यायालयाच्या परिसरातील वाहतुकीत बदल करत २०० मीटर पर्यंत कोणालाही न्यायालयाच्या आवारात फिरकता येणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत. तर दोनशे मीटरच्या बाहेर पोलिसांनी बॅरिकेड लावून रस्ता बंद करत पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला. माध्यम प्रतिनिधींना देखील न्यायालयात व न्यायालयाच्या परिसरात २०० मीटर आज येण्यास बंदी घालण्यात आली.

हे ही वाचा:

Raj thackeray मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का देणार?

रजनीकांतचा जबरदस्त अँक्शन असलेल्या ‘लाल सलाम’चा ट्रेलर प्रदर्शित अनाथ मुलांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम – Aditi Tatkare

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss