सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. विरोधी पक्षातील सर्व नेते हे सत्ताधारी पक्षाकडे जात असल्याचे चित्र हे दिसून येत आहे. कालच काँग्रेस हे नेते म्हणून ओळखले जाणारे अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश हा केला आहे. याआधी बाबा सिद्दीकी, मिलिंद देवरा हे देखील सत्ताधारी पक्षात सहभागी झाले आहेत. हे तिन्ही नेते विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसचे सदस्य होते. विरोधी पक्षातून सत्ताधारी गटात येण्यासाठी चढाओढ सुरु असताना एक सत्ताधारी पक्षातला नेता विरोधी पक्षात जाऊ शकतो.विरोधी पक्षातील अनेक नेते सध्या शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. परंतु आता पुण्यात एक वेगळंच चित्र दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील एक मोठा नेता हा विधिमंडळ, पालिका स्तरावर फार मोठी ताकद नसलेल्या पक्षात हा नेता प्रवेश करु शकतो अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे.
जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे पुन्हा आपल्या स्वगृही परतण्याची शक्यता आहे. शिवसेनेत असणारे शरद सोनावणे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी मनसेत प्रवेश करुन आमदार झाले होते. त्यावेळी ते मनसेचे एकमेव आमदार होते. त्या नंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकीटावर त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. आता शरद सोनावणे स्वगृही म्हणजे मनसेमध्ये परतण्याची शक्यता आहे. ओझर येथील कार्यक्रमात शरद सोनवणे हे राज ठाकरेंसोबत पाहायला मिळाले. त्यामुळे ही शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यानंतर शरद सोनवणे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी झाले होते. शरद सोनवणे यांच्याकडे सध्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. पण तेच शरद सोनावणे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करु शकतात. सध्या राज्यात राजू पाटील यांच्या रुपाने मनसेचा एकमेव आमदार आहे. त्यांच्याआधी शरद सोनावणे यांच्या रुपाने मनसेचा एकमेव आमदार होता.
हे ही वाचा:
पॅराग्लायडिंगच्या पंढरीत रंगणार साहसी क्रीडाप्रकाराचा मेळा
छोट्या पडद्यावरील‘आई कुठे काय करते’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप ? चर्चा सुरु