Wednesday, May 1, 2024

Latest Posts

देशाला विकासाच्या दिशेने न्यायचे असेल तर…मुख्यमंत्र्यांचे ठाण्यात प्रतिपादन

ठाण्यात राजस्थान विकास मंच, महाराष्ट्र द्वारे ७५ व्या राजस्थान स्थापना दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.  राजस्थान स्थापना दिनाच्या निमित्ताने राजस्थान विकास मंचाच्या वतीने ठाणे शहरात आयोजित केलेल्या या  विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून राजस्थानी बांधवांशी संवाद साधला तसेच शुभेच्छा दिल्या. राजस्थान आणि महाराष्ट्र यांचे एकमेकांशी पिढ्यानपिढ्या अनोखे ऋणानुबंध आहेत. या दोन राज्याचे बंध शौर्य आणि वीरता या धाग्याने बांधले गेले आहेत. राजस्थान ही वीर महाराणा प्रताप यांची भूमी आहे तर महाराष्ट्र ही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले.

राजस्थान विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनेही आपले उमेदवार उभे केले होते. तेथील स्थानिक लोकांनी त्यांना चांगली मते दिली, मी स्वतः राजस्थानात जाऊन एनडीएच्या उमेदवारांचा प्रचार केला, तसेच राजस्थानमध्ये निवडून आलेल्या काही आमदारांनी नुकताच शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेशही केला. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच राजस्थान मध्येही सुशासन देण्याची संधी तेथील जनता आम्हाला देत आहे असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. आता लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करतो आहे. संपूर्ण जग आज भारताकडे वेगळ्या दृष्टीने पाहत आहे. त्यामुळे देशाला विकासाच्या दिशेने न्यायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायला हवेत. तसेच, वर्षानुवर्षे आपण या भूमीत राहून आज या भूमीचा एक अविभाज्य भाग झाला आहात, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लेले तसेच राजस्थान विकास मंचाचे सर्व पदाधिकारी आणि राजस्थानी समाजातील बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा:

महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता, दिल्लीत आज महत्वाची बैठक

कर्णधार हार्दिक पांड्याला चाहत्यांनी केले ट्रोल, पोस्ट शेअर करत सोनू सूदने दिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss