Tuesday, May 21, 2024

Latest Posts

महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता, दिल्लीत आज महत्वाची बैठक

निवडणूक आयोगाकडून(Election Commission) निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.

निवडणूक आयोगाकडून(Election Commission) निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर सर्वच पक्षाकडून लोकसभा मतदारसंघातील सर्व पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र अजूनही महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यातच आज मविआतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. या जागावाटपाच्या प्रश्नावरून आज दिल्लीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मविआतील वादग्रस्त जागेचा तिढा सोडवण्यासाठी आज दिल्लीमध्ये महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.

आज मविआतील जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. आज दिल्लीमध्ये महाविकास आघाडीमधील महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावून चर्चा केली जाणार आहे. तसेच मविआमधील वादग्रस्त जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज दिल्लीमध्ये महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गें हे बडे नेते उपस्थित राहणार आहेत.

मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील जागेंवरून अनेक वाद सुरु आहेत. हा वाद मिटवण्यासाठी दिल्लीमध्ये महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. याआधी मुंबईमधील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली होती. त्या बैठकीमध्ये जागा वाटपावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. प्रचार कसा करायचा? कुठले मुद्दे घ्यायचे? यावर चर्चा करण्यात आली होती. मात्र आज होण्या बैठकीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

लहान मुलांच्या आहारात ‘या’ पदार्थाचा समावेश केल्याने शरीराला होतात फायदे

कर्णधार हार्दिक पांड्याला चाहत्यांनी केले ट्रोल, पोस्ट शेअर करत सोनू सूदने दिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss