Sunday, May 19, 2024

Latest Posts

वज्रमूठ सभेला ठाण्यातून दहा हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार – आनंद परांजपे

Thane : महाराष्ट्र दिनी बीकेसी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला (Mahavikas Aghadi Vajramooth Sabha) ठाणे शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमारे 10 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत

Thane : महाराष्ट्र दिनी बीकेसी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला (Mahavikas Aghadi Vajramooth Sabha) ठाणे शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमारे 10 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे-पालघर समन्वयक तथा, ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी दिली.

येत्या एक मे रोजी मुंबईतील बीकेसी मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. या सभेस राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) , काँग्रेस (Indian National Congress) या पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. ठाणे शहरातून सुमारे १९७ बसगाड्या आरक्षित करण्यात आल्या असून ठाणे शहरातील चारही विधानसभा मतदार संघातील सुमारे १० हजार कार्यकर्ते या सभेला जाणार आहेत. दुपारी 3 वाजता सर्व बसगाड्या मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत, असे परांजपे यांनी सांगितले.

दरम्यान, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर, मुरबाड, शहापूर , अंबरनाथ, बदलापूर येथूनही साधारणपणे १५ ते २० हजार कार्यकर्ते वज्रमूठ सभेला उपस्थित राहणार आहेत, असेही आनंद परांजपे यांनी सांगितले. महाविकास आघाडीची ही तिसरी वज्रमुठ सभा पार पडत आहे. मुंबई सोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पदाधिकारी या सभेला उपस्थित राहणार आहेत. ही सभा मुंबईत पार पडत असल्याने हा विकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या सभेमध्ये तिन्ही पक्षातील जनतेशी काय संवाद साधणार याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागली आहे.

हे ही वाचा : 

कामगार दिन का साजरा केला जातो आणि या दिनाची पार्श्वभूमी? जाणून घ्या | International Workers’ Day

तुमचा मोबाईल हरवला? मग फॉलो करा या टिप्स

मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, १ मे पासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना मिळणार खुशखबर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss