spot_img
Sunday, December 15, 2024
spot_img

Latest Posts

Manoj Jarange Patil यांनी सरकारला दिला इशारा, म्हणाले…

सध्या सर्वत्र मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच तापलं असल्याचं चित्र दिसून येत आहे. मराठा आरक्षणावरुन पुन्हा राज्यात रणकंदन होणार आहे. काळ दिनांक २० फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घेण्यासाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

सध्या सर्वत्र मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच तापलं असल्याचं चित्र दिसून येत आहे. मराठा आरक्षणावरुन पुन्हा राज्यात रणकंदन होणार आहे. काळ दिनांक २० फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घेण्यासाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कालच मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. आज माध्यमांशी बोलत असताना मनोज जरांगे यांनी जोरदार हल्लबोल हा केला आहे.

मराठा आरक्षण विधेयक काल विधानसभेत आणि विधानपरिषदेत संमत झालं. या विधेयकानुसार मराठा समाजाला राज्य सरकारी नोकरीमध्ये आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण दिलं जाणार आहे. मात्र या सगळ्याला मनोज जरांगे पाटील यांचा विरोध आहे. आज जालन्यातील अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. जाणून बुजून आणि मुद्दामून सरकार ही उपोषणाची वेळ आणत आहे. काल त्यांनी विषय घ्यायला पाहिजे होता. सामजाची दिशा, म्हणणं ओबीसी आरक्षणाची आहे. त्यांनी जर पालकत्व स्वीकारलं असेल तर त्यांना पश्र्चाताप झाला असावा. १२-१ वाजेपर्यंत दिशा फायनल होईल, असं मनोज जरांगे म्हणाले.

 

राजकारण डोळ्यासमोर ठेवून ही खेळी केली आहे. ते त्यांना लय गरजेचे आहेत. हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं असेल. शहाणे असतील तर त्यांनी कालच्या मॅटरवरून लक्षात घ्यावं. त्यांनी मनाने म्हणलं पाहिजे. लोकांचं विश्वास आहे. विश्वास घात होईल असं वागू नये. तुम्ही दोन्ही दिलं असतं ना तर, १५ दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता. त्यांना परत १०६ सारखे निवडून आणायचे आहेत म्हणून असं करत आहेत. येवढं मोठा मुद्दा असताना निवडणुका घेऊच शकत नाहीत ते, असं म्हणत मनोज जरांगे यांनी आगामी निवडणुकीवर भाष्य केलं. आम्ही वाशीत सांगितलं होतं की, गुलालाचा अपमान करू नका. त्यांनी स्वतः सांगावं कोण आरक्षण देऊ देत नाहीयेत किंवा सांगावं की मीच देत नाहीये, असंही जरांगे पाटील म्हणाले.

हे ही वाचा:

सरकारकडून देण्यात आलेल्या निर्णयावर मनोज जरांगे यांनी दिली प्रतिक्रिया

Exclusive : ‘स्ट्रॉबेरी विथ सीएम’ कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्ट्रॉबेरीपासून वाईन निर्मितीचा प्रकल्प…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss