उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत ‘देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आदित्य ठाकरे (Aadityaa Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदासाठी मार्गदर्शन करणार होते,’ असे वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून चर्चांना वेग आला आहे. शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना हा मोठा गौप्यस्फोट केला. “आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करून मी राष्ट्रीय राजकारणात जाणार,” असे फडणवीस यांनी म्हंटले असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
उद्धव ठाकरे यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक वक्तव्य केल्याने राजकीय वातावरणात चर्चांना सुरुवात झाली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी हा दावा करत म्हणाले, “आदित्य ठाकरे यांना मी मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो आणि स्वतः दिल्लीच्या राजकारणात जातो असे देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते.” यावेळी उद्धव ठाकरे यांनी ‘अमित शहा (Amit Shah) त्यांनी अडीच – अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं,’ असा पुनरुच्चार देखील केला. तसेच अमित शहा भाजपचे अध्यक्ष झाल्यापासून भाजपचा सूर बदलला, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
“तुम्ही देश पहा, आम्ही महाराष्ट्र पाहतो असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. तेव्हापासून भाजप आणि आमच्यात चांगलं चालू होत. २०१२ मध्ये माझ्या वडिलांच्या निधनानंतर मोदी (Narendra Modi) घरी आले होते. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाले तेव्हा असे वाटले कि आपले स्वप्न पूर्ण झाले. पण अमित शहा भाजपचे अध्यक्ष बनल्यावर मात्र भाजपचा सुर बदलला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी अमित शहांनी मला विचारलं कि ‘तुम्ही सर्वे केला आहे का?’ यावर ‘आम्ही लढणारे लोक आहोत आम्ही सर्वे नाही करत.’ असे म्हणालो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वे केला नव्हता. पराभव होणार असं जर सर्व्हेत दिसलं तर आम्ही लढायचं नाही का? भाजपच्या बोलण्यात मग्रुरी दिसत होती. बाळासाहेब गेले, वार करण्याची हीच वेळ आहे असं भाजपला वाटलं. वापरा आणि फेकून द्या हे भाजपाच धोरण आहे. माझयासोबत हेच करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊही , असं वचन मी वडिलांना दिलं होतं. अमित शहा यांनादेखील ते मान्य होतं. अडीच-अडीच वर्षांचं आश्वासन शहांनीच दिलं होतं. माझ्या लोकांसमोर मलाच खोटारडा ठरवण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केला होता.” असे उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत सांगितले.
हे ही वाचा:
Maratha समाजामुळेच Nasik मध्ये ‘नटसम्राट’ Bhujbal Backfoot वर, गोडसेंचा मार्ग मोकळा पण विजयाचं काय?
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.