Saturday, July 27, 2024

Latest Posts

२० फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये विजय वडेट्टीवार यांनी केले भव्य सभेचे आयोजन

मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाला अनेक नेत्यांनी विरोध केला आहे.

मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाला अनेक नेत्यांनी विरोध केला आहे. मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाला विरोध दर्शवला आहे. त्यानंतर आता मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाला ओबीसींची एका नेत्यांनी विरोध केला आहे. ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचे म्हणत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar) यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. २० फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये विजय वडेट्टीवार यांनी भव्य सभेचे आयोजन केले आहे.

यांवर ट्विट करत विजय वडेट्टीवार म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. ही अधिसूचना काढण्याबाबतचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत झाला नाही. मंत्रीमंडळाला विश्वासात न घेता मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत्या २० फेब्रुवारीला संभाजीनगर येथे ओबीसींच्या विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे, असे विजय वडेट्टीवार ट्विट करत म्हणाले.

ओबीसी आरक्षणाला धक्का ना लावता मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ ही छत्रपती शिवाजी महाराजांसमोर घेतलेली शपथ मुख्यमंत्र्यांनी पाळलेली नाही. मराठा समाजाच्या मागण्याच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेली अधिसूचना ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाची फसवणूक आहे. सरकारचा अध्यादेश कायद्याच्या कसोटीवर न टिकणारे आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फसविण्यासाठी केलेली बनवाबनवी असून दुसरे काही नाही. सर्व पक्षीय बैठकीत आम्हाला विश्वास देण्यात आला होता की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला सरकार धक्का लावणार नाही. मात्र काढण्यात आलेली आधीसूचना म्हणजे ओबीसींच्या आरक्षणावर आक्रमण करण्यासाठी सरकारने टाकलेले पाऊल आहे. निवडणुकीच्या तोंडावर बनवा बनवी करून मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाची फसवणूक करण्याचे पाप मुख्यमंत्री महोदयांनी करू नयेत, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

हे ही वाचा:

Budget Session 2024 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी PM Modi यांनी दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले

अशोक सराफ यांचा जीवनप्रवास,आणि मजेशीर किस्से

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss