Wednesday, May 15, 2024

Latest Posts

राज्यामध्ये दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

राज्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. राज्यामध्ये अवकाळी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. हवामान विभागाने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. राज्यमध्ये दोन दिवस येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

राज्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. राज्यामध्ये अवकाळी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. हवामान विभागाने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. राज्यमध्ये दोन दिवस येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर परभणी,लातून, हींगोली या ठिकाणी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ज जारी करण्यात आला आहे. राज्यामध्ये पावसाचा धडाका सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाच्या पारा देखील ४० अंश सेल्‍सीअसपेक्षा अधिक आहे. परंतु सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात होते. काळ राज्यमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडला.

पुण्यामध्ये देखील काल अनेक भागांमध्ये पाऊस पडला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह गुरुवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान सुमारास पाऊस तासभर धो-धो बरसला होता. अवकाळी पावसामुळे भूमकर चौकातील भुयारी पुलात तब्बल गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्याने आयटीयन्ससह स्थानिक रहिवाशांना मोठ्या मनःस्थापाला सामोरे जावे लागले. अनेक वाहने या पाण्यात बंद पडली होती. प्रचंड उन्हानंतर काळे ढग भरून आल्याने दुपारी सुमारे एक तास हजेरी लावल्याने गटारी तुडुंब भरून मुख्य मार्गांवर पाणी साठले होते आणि ते जागोजागी दिसून आले. अचानकपणे पावसाने लावलेली हजेरीमुळे बाजारात दाखल शेतकरी बांधवांची देखील हाल झाले.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यामध्ये महाराष्ट्रात गेल्या ६२ वर्षांमधील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये ४६.७ मिलिलिटर पावसाची नोंद झाली. याआधी १९६२ मध्ये एप्रिल महिन्यामध्ये २३.४ मिलीमीटर पाऊस पडला होता. त्यानंतर या वर्षीच्या एप्रिलमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्याबरोबर हा एप्रिल महिना गेल्या १० वर्षात सर्वाधिक उष्ण आणि सर्वाधिक थंड देखील राहिला आहे.

हे ही वाचा : 

“राज ठाकरे यांनी जसे त्यांच्या काकांवर लक्ष ठेवले तसे मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेल”, अजित पवारांचे प्रत्युत्तर

वरळीच्या पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्याचा मृत्यू

मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याचा विचारात असाल तर एकदा रेल्वेचे वेळापत्रक नक्की पहा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss