Friday, April 26, 2024

Latest Posts

वरळीच्या पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्याचा मृत्यू

Death of a student at Poddar Ayurveda College, Worli

Mumbai Student Protest : २२ वर्षीय विद्यार्थ्याचा झाडावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मुंबईतील वरळी पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात (podar ayurvedic hospital worli mumbai) घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाविद्यालयात हळहळ व्यक्त केली जातं आहे. तर हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेचं विद्यार्थाचा मृत्यू झाल्याचा आरोप महाविद्यालयातील अन्य विद्यार्थ्यांनी केला.

मुंबईतील वरळी येथील पोद्दार आयुर्वेद रुग्णालयात बीएएमएसला (BMMS) शिकणाऱ्या २२ वर्षीय दयानंद काळे (Dyanand Klae) या विद्यार्थ्याचा झाडावरून पडून मृत्यू झाला. आंब्याच्या झाडावरून तोल जाऊन दयानंद खाली कोसळला दरम्यान त्याच्या डोक्याला दुखापत झाली. त्याचवेळी दयानंद काळे याला पोद्दार आयुर्वेद रुग्णालयातच दाखल करण्यात आले होते. परंतु रुग्णालयातील सेवा अभावी व रुग्णालय प्रशासनाच्या विरंगाईमुळे दयानंद याचा मृत्यू झाल्याचं त्याच्यासोबत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

रुग्णालय प्रशासनाच्या विरुद्ध या विद्यार्थ्यांनी निदर्शने केली आहे. जखमी विद्यार्थ्याला साधी ॲम्बुलन्स रुग्णालय प्रशासन देऊ शकलो नाही. वेळेवर उपचार न झाल्याने एका निष्पापाचा बळी गेला असे या विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे. याच प्रकरणी जाब विचारात त्यांनी रुग्णालयातील ओपीडी सेवा बंद केली. तसेच, रुग्णालयातील प्रशासनाविरोधात त्यांनी निदर्शने केली. आठ तासांच्या कालावधीनंतर या संतप्त विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहेत. धाराशिव वरून मुंबई बीएमएसचे शिक्षण घ्यायला आलेल्या दयानंद काळे याच्या अशा अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासोबतच जर असा प्रकार घडत असेल तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना किती त्रास सहन करावा लागत असेल याची प्रचिती या घटनेमुळे जाणवते.

हे ही वाचा : 

ठाण्यात रंगणार कबड्डीचा थरार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

दिलखुलास राज; सल्ला, उपदेश धकधकत्या काळाची अनुभूती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss