Friday, April 19, 2024

Latest Posts

महाराष्ट्र बिहारच्या वाटेवर, गणपत गायकवाड यांच्या घरावर देवंद्र फडणवीस बुलडोझर चालवणार का? एमआयएमचा प्रश्न

भाजपचे कल्याण पूर्व मधील आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर २ फेब्रुवारीला रात्री पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता.

भाजपचे कल्याण पूर्व मधील आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर २ फेब्रुवारीला रात्री पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. त्याप्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे कि नाही असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे ठेकेदार असलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्र राज्याला बिहारच्या वाटेवर घेऊन चालले आहेत का? मीरा भाईंदर मधील गरीब मुस्लिम समाजावर बुलडोझर चालवणारे पोलीस आता भाजपा आमदाराच्या (Ganpat Gaikwad) घरावर बुलडोझर चालवणार का? असा प्रश्न एआयएमआयएम (MIM) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफार कादरी कार्याध्यक्ष यांनी उपस्थित केला आहे.

अब्दुल गफार हे भिवंडीतील आगामी लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी कार्यकर्त्यांच्या भेटीला गेले होते. अजित पवार यांना जशी क्लीन चीट देण्यात आली तशीच किल्न चीट गोळीबार करणाऱ्याभाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनाही दिली जाईल, अशी टीका एमआयएमने केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आईचे दूध पिले असेल असेल तर आमदार गणपत गायकवाड यांच्या घरावर बुलडोझर चालवून दाखवावा, असे देखील आव्हान देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आले आहे.

आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्या. या दोघांमध्ये ५० गुंठा जमिनीवरून वाद चालू होते. गणपत गायकवाड यांचा मुलगा देखील पोलीस ठाण्यात उपस्थित होता. मात्र पोलीस या प्रकरणावर कारवाई करत नसल्यामुळे स्वतः गणपत गायकवाड पोलीस ठाण्यात पोहचले आणि त्यानंतर त्यांनी थेट महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळीस बोलताना गणपत गायकवाड म्हणाले, मी स्वत: पोलिसांसमोरच गोळी झाडली. याचा मला पश्चाताप नाही. कारण माझ्या मुलांना जर पोलिसांच्या समोर मारत असतील, तर मग मी काय करणार. पोलिसांनी मला पकडले, त्यामुळेच तो वाचला. मी त्यांना जीवे मारणार नव्हतो, पण पोलिसांच्या समोर जर असे कोणी करत असेल तर आत्मसंरक्षणासाठी हे करणे गरजेचे आहे, असे गणपत गायकवाड म्हणाले. गणपत गायकवाड यांना १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे ही वाचा:

शरद पवार कधी मारतील याची तुम्ही वाट बघत आहेत: जितेंद्र आव्हाडांनी साधला अजित पवारांवर निशाणा

आपल्या बापाशी बेइमानी करणारी पहिले अवलाद कोण असेल तर उद्धव ठाकरे : रामदास कदम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss