Saturday, July 27, 2024

Latest Posts

Dr. Shrikant Shinde यांच्या संवेदनशीलतेचं दुर्मिळ दर्शन, अमित शाहांकडून कौतुक

यंदाचा संसदरत्न पुरस्कार जिंकत दुसऱ्या बाजूला मतदार संघात हजारो कोटींच्या विकासकामांचा धडाका लावणारे कल्याण पूर्व लोकसभा मतदार संघाचे खासदार डॅा.श्रीकांत शिंदे यांनी आपल्या हॅटट्रिक वर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे यंदाचा त्यांच्या वाढदिवशी एकापेक्षा एक कार्यक्रमांसाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली होती. मात्र शुक्रवारी आपल्या सहकाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर खासदार डॅा.श्रीकांत शिंदे यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करताना पुष्पगुच्छ, केक आणि मिठाई यांपासून चार हात लांब रहात आपल्या अंगच्या वेगळ्या आणि राजकारण्यांच्या अंगी दुर्मिळ असलेल्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवले.

कल्याण पूर्व या लोकसभा मतदार संघात येणाऱ्या द्वारली गावातील अशोक जाधव यांच्या बरोबरच्या जमिनीच्या वादातून या भागातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर बेछूट गोळीबार केला. हिल लाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनात हा बेधुंद गोळीबार करणाऱ्या गणपत पाटील यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील या दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यापैकी महेश गायकवाड ह्यांना सहा गोळ्या लागल्याने ते ठाण्याच्या ज्युपिटर रूग्णालयात मृत्युशी झुंज देत आहेत. आपल्या सहकाऱ्यांना जीवन मरणाच्या दारात सोडून वाढदिवसाचा जल्लोष करणे योग्य नाही यासाठीच खासदार डॅा. श्रीकांत यांनी ना कुटुंबियांसह घरात केक कापला की नाही पक्षातील कार्यकर्त्यांनी आणलेले केक कापले. तसेच कल्याण लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून ना पुष्पगुच्छ स्विकारले की नाही भेटवस्तू. डॅा. शिंदे यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, कला सामाजिक अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाभर करण्यात आले होते. यापैकी ज्युपिटर रूग्णालयातील आजारी लहान मुलांच्या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त कोणत्याही ठिकाणी खासदार श्रीकांत यांनी उपस्थिती दिली नाही. इतकंच नव्हे तर कार्यकर्त्यांनी आणलेले पुष्पगुच्छही न स्विकारता विनम्रपणे केवळ अभिवादन करत धन्यवाद मानले.

आपल्या वाढदिवसानिमित्ताचे सर्व कार्यक्रम नाकारणाऱ्या डॅा. श्रीकांत यांनी ज्युपिटर रूग्णालयाच्या आयसीयू मध्ये जाऊन मृत्युशी झुंज देणाऱ्या महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तेव्हा त्यांच्या सोबत माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, माजी नगरसेवक राम रेपाळे, पवन कदम हेही होते. रविवारी सकाळी ११ वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॅा. श्रीकांत यांना दूरध्वनी करून वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. लोकसभा मतदार संघांतील विकास कामांचा धडाका असाच सुरू ठेवत येणाऱ्या निवडणूकीत हॅटट्रिक करण्याच्या शुभेच्छांसह आशिर्वाद दिले. राजकीय विरोधकांनी खासदार शिंदेंना लक्ष्य करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असताना त्यांनी आपल्या वाढदिवशी दाखवलेली संवेदनशीलता सध्या राजकरणात सध्या दुर्मिळ होत चाललीय. शिंदेंनी आपल्या अंगच्या दाखवलेल्या या संवेदनशीलतेचं संपूर्ण ठाणे जिल्ह्यात कौतुक होत आहे.

हे ही वाचा:

गडचिरोली जिल्हा हा नेक्स्ट स्टील ऑफ इंडिया होणार, देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

Aaditya Thackeray PC Live : निवडणूक तोंडावर आल्यावर लोकार्पणाचे कार्यक्रम…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss