Tuesday, April 23, 2024

Latest Posts

अशोक चव्हाणांच्या राजीनामानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले…

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काल दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड ही घडली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून काढता पाय घेतला आहे. आणि आता लवकरच ते भाजप मध्ये सहभागी होणार आहे. तर नुकतंच काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकी यांनी देखील काँग्रेस मधून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडलं असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) वारे हे वाहत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. सर्व पक्ष ऍक्शन मोड मध्ये आल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच महाविकास आघाडीनंही (Maha Vikas Aghadi) महायुतीविरोधात एकत्र येत आगामी लोकसभेसाठी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे निवडणुकीला अवघे काहीच महिने राहिलेले असताना काँग्रेसच्या गटातून अनेक मोठ्या मोठ्या घडामोडी या समोर येत आहेत. तर शोक चव्हाण यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यांनतर आज संजय राऊत यांनी चांगलाच हल्लबोल हा केला आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांनी स्वत:चे १२ वाजवून घेतले आहेत, असं संजय राऊत म्हणालेत. आज सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय राऊत माध्यमांशी संवाद साधत होते. तेव्हा त्यांनी महायुतीवर निशाणा साधला.

यावेळी बोलत असताना राऊत म्हणाले आहेत की, शंकरराव चव्हाण यांचे पुत्र व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल कॉंग्रेस पक्ष सोडला. स्वत:चे बारा वाजवून घेत आहेत,भाजपवासीय होत आहेत. अशोक चव्हाण स्वत:ची अवहेलना करुन घेत आहेत. कॉंग्रेस म्हणजे चव्हाण कुटुंब. मोदी देशाला काय तोंड दाखवणार? मोदींच्या शिरपेचात भाजपने खोटेपणाचा आणखीन एक तुरा महाराष्ट्र भाजपने रोवला आहे का ? मोदींनी नांदेड मध्ये जाऊन कारगील मधील शहिदांच्या भूखंडावर अशोक चव्हाण यांनी कसा घोटाळा केला आणि शहिदांचा अपमान केला हे सांगतात. आज त्या शहिदांचा अपमान धुऊन काढला का ? काँग्रेस मुक्त भारत ही त्यांची घोषणा केली.त्यांनी काँग्रेस शुध्दीकरण चालवले आहे.

तसेच संजय राऊत म्हणाले आहेत की, काँग्रेस बरोबर थेट युती करायचे टाळून भाजप असा पद्धतीने युती करत आहे. अशा पद्धतीने भाजपा २०० पार ही जाणार नाही. फडणवीस यांनी सिंचन, आदर्श घोटाळा कसा झाला हे समजावून सांगितले आहे. अशोक चव्हाण हे अत्यंत हुशार राजकारणी व प्रशासक होते. महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रदिर्घ अनुभव आहे. त्यांनी घेतलेला हा निर्णय हा त्यांच्या स्वत:च्या राजकीय भविष्यासाठी धोक्याचा आहे. पाकीटमारी करणे,चोऱ्या करणे, भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेणे ही स्ट्रॅटजी आहे का ? भाजपने कितीही फोडाफोडी केली तरीही लोकसभेमध्ये मविआ च्या १० जागा भाजप पेक्षा जास्त असतील. भाजपा पूर्णपणे कॉंग्रेस झाले आहे.

हे ही वाचा: 

पॅराग्लायडिंगच्या पंढरीत रंगणार साहसी क्रीडाप्रकाराचा मेळा

छोट्या पडद्यावरील‘आई कुठे काय करते’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप ? चर्चा सुरु

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss