Saturday, July 27, 2024

Latest Posts

छगन भुजबळांच्या आरोपांवर अमोल मिटकरी यांच उत्तर

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे-पाटील यांच्यात खडाजंगी सुरू आहे.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे-पाटील यांच्यात खडाजंगी सुरू आहे. अशातच छगन भुजबळांनी खोटे कुणबी दाखले देण्याचं काम सुरू असल्याचं आरोप केला होता. यावर अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपूर विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

छगन भुजबळ काय म्हणाले?
“आम्हाला पूर्वीचे कुणबी दाखले मान्य आहेत. पण, माजी न्यायमूर्ती शिंदे सगळीकडे फिरत आहे. आणि खोटे कुणबी दाखले देण्याचं काम सुरू आहे,” असं विधान छगन भुजबळांनी केलं होतं.“नागपूरमधील राजे भोसले हे कुणबी”
यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र भेटत आहेत. मी स्वत: मराठा समाजाच्या संदर्भात अनेक कुणबी दाखले दिले आहेत. नागपूरमधील राजे भोसले हे कुणबी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तत्कालीन इतिहासातील संदर्भात कुणबी हा उल्लेख आढळतो.”

“ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला न्याय द्यावा”
“त्यामुळे मराठा समाजाची मागणी रास्त आहे. पण, आमच्या पक्षाची भूमिका ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे,” असं मिटकरींनी सांगितलं आहे.

“मी ओबीसी समाजाचा एक घटक”
भुजबळांकडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा प्रश्न प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं विचारल्यावर अमोल मिटकरींनी म्हटलं, “दोन्ही समाजाकडून तेढ निर्माण होतील, अशी वक्तव्य करता कामा नये. तसेच, जरांगे-पाटील आणि भुजबळांनी एकमेकांवर टीका करू नये. मी एका कुणा एका समाजाची बाजू घेत नाही. मी ओबीसी समाजाचा एक घटक आहे.”

हे ही वाचा:

देशातील ‘या’ दोन दिवसांत मुसळधार पावसाचे थैमान

राज्यातील ग्रामपंचायतीचा कारभार आजपासून ठप्प होण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss