Saturday, July 27, 2024

Latest Posts

विद्रोहाचा आवाज तसाच दाबून टाकणार आहेत का?, JITENDRA AWHAD यांचा सवाल

अशोक चव्हाणांनी राजीनामा का दिला हे माहीत नाही. अशोक चव्हाणांच्या घरात काँग्रेसने १९५२ सालापासून मंत्रिपद दिले, त्यांचे घर काँग्रेसचे विचारांचे होते. शंकरराव चव्हाण कट्टर काँग्रेसचे होते. अशोक चव्हाण देखील कट्टर काँग्रेसचे होते त्यामुळे, त्यांनी राजीनामा दिला हे दुर्दैवी आहे. असे मत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. उल्हासनगर येथील गोळीबार प्रकरणाबाबत विचारले असता, सत्ताधारी पक्षांमध्ये असलेली स्पर्धा ही धोकादायक आहे. गणपत गायकवाड यांनी केलेले आरोप गंभीर असल्याचे कल्याण येथे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

९ फेब्रुवारी रोजी पुण्यात झालेल्या निखिल वागळेंच्या गाडीवरील हल्ल्याबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला म्हणजे स्पष्ट आहे की, विद्रोहाचा आवाज जगू देणार आहेत का नाही. विद्रोहाचा आवाज तसाच दाबून टाकणार आहेत का? विद्रोहाचा आवाज जिवंत राहिला नाही तर तुम्ही कसे काम करणार? असा सवाल यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, खासदार श्रीकांत शिंदे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आणि फुले-शाहू आंबेडकरांची देखील ओळख नसेल. इतिहास माहीती नसल्यामुळे अशाप्रकारच्या चुका होतात, असे माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा: 

एकनाथ शिंदे हे फेकूचंद,फेकूचंदवर कोण विश्वास ठेवणार? हे गुंडांचे सरदार; संजय राऊतांची शिंदेंवर टीका

मुंबईच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक, असे करा प्रवासाचे नियोजन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss