Tuesday, April 16, 2024

Latest Posts

चाळीसगावाचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू

जळगावमधील चाळीसगावमध्ये भाजपाचे माजी नगरसेवक बाळू मोरे (Balu More Firing Case) त्यांच्यावर पाच अज्ञात व्यतींनी गोळीबार केला.

जळगावमधील चाळीसगावमध्ये भाजपाचे माजी नगरसेवक बाळू मोरे (Balu More Firing Case) त्यांच्यावर पाच अज्ञात व्यतींनी गोळीबार केला. या गोळीबारामध्ये बाळू मोरे गंभीर जखमी झाले होते. गोळीबारानंतर त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु असताना आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. चाळीसगाव मध्ये झालेल्या गोळीबारानंतर सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर तीन दिवसांआधी काही अज्ञात व्यतींनी कार्यलयात जाऊन त्यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये ते गंभीर रित्या जखमी झाले. अचानक झालेल्या गोळीबारानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली. जखमी अवस्थेमध्ये माजी नगरसेवक बाळू मोरे यांना नाशिक येथील अशोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. चाळीसगाव शहरातील हनुमान वाडीमध्ये त्यांचे कार्यालय होते. याचं कार्यलयामध्ये माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर पाच अज्ञात व्यतींकडून गोळीबार करण्यात आला होता. अज्ञात तरुणांनी चेहरा मास्क लाऊन बाळू मोरेंवर गोळीबार केला. या गोळीबाराचा संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस आरोपींचा सध्या शोध घेत आहेत. महेश गायकवाड, अभिषेक घोसाळकर, बाळू मोरे या नेत्यांवर एका पाठोपाठ एक गोळीबार झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. माजी नागरसेवकांच्या हत्येनंतर नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

हे ही वाचा: 

गुंडांनी गुंडा साठी चालविलेले राज्य; फोटो शेअर करत संजय राऊतांनी केली सरकारवर टीका

हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला भारतरत्न मिळायला हवा – Raj Thackeray

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss