राज्यभरात मागील काही दिवसांपासून भरदिवसा होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. हे सरकार तात्काळ बरखास्त करावे, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे.
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याचे फेसबुक लाईव्हमध्ये दिसून आले आहे. पण ज्या मॉरिस नोरोन्हाने गोळीबार केल्याचे बोलले जात आहे ते त्यामध्ये दिसले नाही. मॉरिसने नंतर आत्महत्या केली. ती आत्महत्या त्याने का केली असावी? अभिषेकची हत्या झाली, गुंडाने ती हत्या केली. या गुंडाने स्वतः आत्महत्या का केली? हा सुद्धा प्रश्न आहे. अभिषेकला गोळ्या झाडल्या पण कोणी झाडल्या हे कळत नाही. बॉडीगार्ड मॉरीसने ठेवला होता, का ठेवला होता? या दोघांना मारण्याची कोणी सुपारी दिली होती का? असा संशय आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. गेले काही दिवस उदविग्न अवस्था आहे. बेबंधशाही सुरु आहे. महाराष्ट्राची जनता कमालीची दुखावली गेली आहे. गुंडाचा हैदौस महाराष्ट्रामध्ये सुरु आहे.सरकारमध्ये गँगवॉर सुरु आहे. गुंडासोबत मंत्र्याचे फोटो समोर येतायत.अभिषेकची हत्या झाली, गुंडाने ती हत्या केली. या गुंडाने स्वतः आत्महत्या का केली? हा सुद्धा प्रश्न आहे. अभिषेकला गोळ्या झाडल्या पण कोणी झाडल्या हे कळत नाही. बॉडीगार्ड मॉरीसने ठेवला होता, का ठेवला होता? या दोघांना मारण्याची कोणी सुपारी दिली होती का? असा संशय आहे. राज्यपालांनी या गुंडाचा सत्कार केल्याचे फोटो समोर आलेत, सत्कार करताना पार्श्वभूमी तपासली जात नाहीत का? काल निखिल वागळे असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. तो हल्ला भाजपच्या लोकांनी केला, असा संशय उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला बाईंनी पत्र लिहिले. असे पहिल्यांदा होतंय की पोलीस महासंचालक अशाप्रकारे पत्र समोर आणताय.राज्य सरकार भरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी आम्ही जनता न्यायालयात करत आहोत. आम्ही राज्यपालाकडे जाणार नाही, त्यापदाचा काही अर्थ राहिला नाही. माझी तळमळ सर्वोच्च न्यायालय समजून घेऊन लवकर निर्णय घेईल. एकच अशा आता सर्वोच न्यायलयाकडून आहे. लवकर निवडणुका जाहीर करतील किंवा यावर लवकर निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्य सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी आम्ही जनता न्यायालयात करत आहोत. फडणवीस यांना कलंक फडतूस शब्द वापरले होते. पण आता गृहमंत्री मनोरुग्ण म्हणून लाभला आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा:
पुण्यातील ‘निर्भय बनो’ कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ, निखिल वागळेंवर हल्ला
चाळीसगावाचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू