Saturday, July 27, 2024

Latest Posts

लोकप्रतिनिधींना गावबंदी करणं हा गुन्हा, छगन भुजबळ

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी करणं हा गुन्हा आहे. त्याला एक महिना शिक्षा झाली पाहिजे, असे वक्तव्य छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) केली आहे.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी करणं हा गुन्हा आहे. त्याला एक महिना शिक्षा झाली पाहिजे, असे वक्तव्य छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या सरकारला देण्यात आलेल्या इशाऱ्यावर देखील भुजबळांनी टीका केली आहे. या तारखेपर्यंत द्या आणि त्या तारखेपर्यंत द्या म्हणजे ब्लॅकमेलिंग नाही तर आणखी काय आहे? सरकारने तीन तीन न्यायाधीश बसवले आहे वाट पाहा, असा सल्ला देखील जरांगेंनी दिला आहे. मी अनेक मोठे मोठे लोकं अंगावर घेतले आहे. तू किस झाड की पत्ती आहे, असे म्हणत जरांगेच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे.

गावबंदीमुळे आमदार खासदार यांना गावात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. त्यांना काम करू दिले जात नव्हते . हा गुन्हा आहे याला एक महिन्याची शिक्षा देखील आहे. एकदा ओबीसीमध्ये आल्यानंतर शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण लागू होणार आहे. ओबीसीमध्ये आलात तर त्याला सर्व लाभ मिळतात. ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार नाही पण धक्का बसणारच आहे. सरसकट प्रमाणपत्र दिले म्हणजे ओबीसीमध्ये आले. बहुतांश लोकं मलाच दोषी धरत आहे. मी पूर्ण मराठा समाजाला दोष देत नाही, पण काहींची झुंडशाही सुरू आहे, दादागिरी करत आहे त्यांच्या विरोधात आहे, असेही भुजबळ म्हणाले.

२४ डिसेंबरला हल्ला करण्याची आणि घर जाळण्याची तयारी सुरु असल्याचा आरोप मंत्री भुजबळांनी काल विधानसभेत जरांगेंवर केला आहे. समाज माध्यमावरील मेसेजही वाचून दाखवला आहे. प्रकाश सोळंकी, संदीप क्षीरसागर यांची घरं जाळली त्याप्रमाणेच माझंही घर जाळलं जाईल भुजबळांनी भीती व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्न करत आहे. बीडमध्ये अनेकांची घरं,कार्यालय ऑफिस कट करून पेटवण्यात आली. यात जीवितहानी होण्याची शक्यता आहे मात्र ते वाचले, असे भुजबळ म्हणाले.

हे ही वाचा:

Nana Patole यांचा थेट हल्लाबोल, भाजप शिवरायांचा महाराष्ट्र पेटवतंय…

संसदेत झालेल्या गोंधळावर संजय राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss