Wednesday, May 1, 2024

Latest Posts

लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल हा विश्वास- DR. AMOL KOLHE

लोकसभा निवडणुकीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी १८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आणि माझ्या आईच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघातून मी ‘तुतारी फुंकणारा माणूस’ या चिन्हावर निवडणूक लढवित आहे. असे डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

या निवडणूकीचा उमेदवारी अर्ज  पुणे विधानभवन येथे खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी राज्यमंत्री  विश्वजित कदम, आमदार अशोक पवार, आमदार सचिन अहिर, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार महादेव बाबर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आणि अजित दादांचे पुतणे युगेंद्र पवार या सर्वांची उमेदवारी अर्ज भरतांना विशेष उपस्थिती होती.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मला पुन्हा लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल हा विश्वास आहे. शेतकरी बांधवांच्या हक्कांसाठी, माता भगिनींच्या सन्मानासाठी, युवकांच्या भविष्यासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मी अविरतपणे संघर्ष करत आहे. या संघर्षाला मायबाप जनतेचं पाठबळ नक्की मिळेल, हा विश्वास असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

BJP च्या भट्टीत शिवसैनिकांचा बळी, CM Eknath Shinde यांचा अभिमन्यु झालाय, Shivsena नेत्याचे गंभीर आरोप

BJP कडून नव्या प्रसिद्ध चेहऱ्यांची चाचपणी सुरु, कोणता उमेदवार ठरणार सरस?। Ujjwal Nikam|Madhuri Dixit

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss