Friday, April 19, 2024

Latest Posts

भाजपला दुसऱ्यांचे नेते पळवायची सवय, विजय वडेट्टीवार

काँग्रेसला मोठं खिंडार पडलं असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर आज अशोक चव्हाण हे भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर दिनांक १६-१७ फेब्रुवारीला काँग्रेसचं शिबीर पडणार आहे. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल हा केला आहे.

सध्या सगळीकडे आगामी लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) वारे हे वाहत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. सर्व पक्ष ऍक्शन मोड मध्ये आल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच महाविकास आघाडीनंही (Maha Vikas Aghadi) महायुतीविरोधात एकत्र येत आगामी लोकसभेसाठी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे निवडणुकीला अवघे काहीच महिने राहिलेले असताना काँग्रेसच्या गटातून अनेक मोठ्या मोठ्या घडामोडी या समोर येत आहेत. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि काल दिनांक १२ फेब्रुवारी रोजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण असे पक्षातील ज्येष्ठ नेते एकामागोमाग एक पक्षातून बाहेर पडत आहेत त्या मुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडलं असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर आज अशोक चव्हाण हे भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर दिनांक १६-१७ फेब्रुवारीला काँग्रेसचं शिबीर पडणार आहे. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल हा केला आहे.

यावेळी बोलत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत की, एकीकडे भाजप अब की बार ४०० पार चा नारा देत आहे. पण दुसरीकडे ते इतर पक्षातील नेते पळवत आहेत. यांना यांच्यावरच विश्वास राहिला नाही अशी परिस्थिती देशामध्ये दिसत आहे. भाजपला स्वत:च्या कामगिरीवर यश मिळवता येत नाही. प्रभू रामचंद्राच्या नावे राजकारण करून झालं , त्यावरही त्यांना फार काही करता आलं नाही. त्यामुळेच इतर पक्षातील नेते पळवून, नेते फोडून घर सजवण्याचं काम भाजप करत आहे. लोकांना हे मान्य होणार नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

राजकारणात पक्षात बदल होत असतात, लोकं येत असतात, तसे जातातही. एक व्यक्ती पक्षाच्या बाहेर गेली म्हणजे काही पूर्ण पक्ष डिस्टर्ब होत नाही. या परिस्थितीमधून काँग्रेस पुन्हा उभारी घेईल आणि पक्ष मजबुतीन उभा राहील असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. मी कायम काँग्रेससोबतच आहे. पक्षाने मला खूप काही दिलं. मी काँग्रेससोबत होतो, काँग्रेससोबत आहे आणि काँग्रेससोबतच राहणार असेही वडेट्टीवर यांनी स्पष्ट केलं.पक्षाने मला भरभरू दिलं, मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहूनच विचारधारेसोबत काम करणार असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा: 

पॅराग्लायडिंगच्या पंढरीत रंगणार साहसी क्रीडाप्रकाराचा मेळा

छोट्या पडद्यावरील‘आई कुठे काय करते’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप ? चर्चा सुरु

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss