Friday, April 19, 2024

Latest Posts

Uddhav Thackeray यांना BJP ने घेरलं, फोटो ट्विट करत म्हणाले…

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख (Shiv Sena UBT) उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) दिनांक ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी कोकण दौऱ्यावर होते आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी, मानवानं अश्या अनेक ठिकाणावरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका ही केली

वंदे भारत एक्स्प्रेस हे नाव आता प्रत्येकालाच माहित झालं आहे. या एक्सप्रेसची भुरळ सर्वच भारतीयांना पडली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसने प्रत्येकालाच प्रवास करायला हा आवडत असतो. मग तो व्यक्ती सामान्य नागरिक असो किंवा राजकारणी व्यक्ती असो. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस असो की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार असो, यांनीही वंदे भारत रेल्वे प्रवासाचा आनंद घेतला आहे. आता तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी देखील वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास केला आहे. त्यांच्या या प्रवासावर आता भाजपने जोरदार टीका ही केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख (Shiv Sena UBT) उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) दिनांक ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी कोकण दौऱ्यावर होते आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी, मानवानं अश्या अनेक ठिकाणावरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका ही केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. सरकारकडून विकास झाला नाही, असे त्यांनी आपल्या भाषणांमधून टीका केली. प्रत्येक वेळेस सरकारण टीकेची झोड करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वंदे भारत एक्स्प्रेस मधून प्रवास हा केला आहे. त्यानंतर भाजपने उद्धव ठाकरे यांचा वंदे भारतमधील प्रवासाचा फोटो ट्विट करत तिसरी बार….. मोदी सरकार !, असे दोन शब्दांचे कॅप्शन दिले आहे. भाजपकडून यासंदर्भात दोन फोटो ट्विट केले गेले आहे.

 

वंदे भारत एक्सप्रेस ही नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी प्रकल्प आहे. बुलेट ट्रेन आणि वंदे भारत ट्रेनसाठी मोदी सरकारने मोठे काम केले आहे. त्यामुळे भाजपने उद्धव ठाकरे यांच्या वंदे भारत प्रवासाचे दोन फोटो ट्विट केले आहे. पहिल्या फोटोत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत विनायक राऊत दिसत आहे. भाजपने म्हटले आहे की, मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, वंदेभारत ट्रेनचा आरामदायी प्रवास, तिसरी बार….. मोदी सरकार !

दुसऱ्या एका फोटोवर भाजप महाराष्ट्राकडून कॅप्शन दिले गेले आहे की, कुठे आहे विकास ? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटतं. लवकरच बुलेट ट्रेनची देखील सफर घडवून आणणार हे नक्की कारण…भाजपने हे फोटो उद्धव ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना टॅग केले आहेत.

हे ही वाचा:

पॅराग्लायडिंगच्या निसर्गसंपन्न पंढरीमध्ये रंगणार ‘टाइम महाराष्ट्र’चे महापॅराग्लायडिंग

Raj Thackeray Live: काळाराम मंदिरात दर्शनाला जाणार, नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अक्षरा समोर आलं भुवनेश्वरीच सत्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss