Saturday, July 27, 2024

Latest Posts

लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचा मेगाप्लॅन

लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने मेगाप्लान तयार केला असल्याची माहिती समोर आलीये. ५५ दिवसांता आचारसंहिता लागणार असून सर्व आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने मेगाप्लान तयार केला असल्याची माहिती समोर आलीये. ५५ दिवसांता आचारसंहिता लागणार असून सर्व आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर भाजपच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्व आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेला फार दिवस राहिले  ५५ दिवसांत आचारसंहिता लागेल, त्यामुळे कामाला लागा अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून सर्व आमदारांना नमो टार्गेट देण्यात आलं आहे. आज देवगिरीवर झालेल्या बैठकीत तसेच यापूर्वी मुंबईत झालेल्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बैठकीत अनुपस्थित आमदारांच्या संख्येबाबत कानउघडणी देखील करण्यात आलीये. याच बैठकीच्या माध्यमातून भाजप श्रेष्ठींनी आमदारांचा क्लास घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.

भाजपचा मेगाप्लान नेमका काय?
२५जानेवारीपर्यंत राज्यात ५० लाख नमो अॅप डाऊनलोड करुन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक आमदारांनं मतदारसंघात किमान ३० हजार अॅप डाऊनलोड करुन घ्यावेत. आमदारांनी रोज सकाळी किमान ५ मिनिटं नमो अॅपवर घालवावीत. मतदारसंघात १५० बूथ प्रमुख तयार करावेत, बूथप्रमाणे सुपर वॉरियर देखील नेमावेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेला आता जास्त दिवस नाहीत. फेब्रुवारी महिन्यात देवेंद्र फडणवीसांची लोकसभा निवडणुकांसाठीची विशेष यात्रा देखील निघणार आहे. ही यात्रा प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून जाईल, असा मेगाप्लान भाजपकडून तयार करण्यात आलाय.

हे ही वाचा:

Nana Patole यांचा थेट हल्लाबोल, भाजप शिवरायांचा महाराष्ट्र पेटवतंय…

संसदेत झालेल्या गोंधळावर संजय राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss