Tuesday, May 21, 2024

Latest Posts

सांगलीत मनपा स्थायी सभापतीपदी निवडणुकीत भाजपचा विजय तर, काँग्रेसच्या पदरी अपयश

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्थायी सभापतीपदासाठी निवडणूक पार पडली. यात भाजपचे उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन सदस्य अनुपस्थित राहिल्याने काँग्रेसने एकाकी लढत दिली. आणि या चुरशीने झालेल्या निवडणुकीत भाजप उमेदवार धीरज सुर्यवंशी यांना ९ तर काँग्रेस उमेदवार संतोष पाटील यांना अवघी ५ मते मिळाली. केवळ राष्ट्रवादीचे दोन उपस्थित न राहिल्याने भाजप आघाडीवर आलं आहे.

हेही वाचा : 

रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, आदित्य ठाकरेंचा नवा आरोप

यामुळे सांगली महापालिकेच्या स्थायी सभापती निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करीत भाजपचे उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा विजय झाला. सभापतीपदी विजयी झाल्यानंतर धीरज सुर्यवंशी यांचा आमदार सुधीर गाडगीळ, माजी आम दिनकर पाटील, दिपकबाबा शिंदे, शेखर इनामदार आदीसह भाजपा नेत्यांनी सत्कार केला.

या निवडणुकी दरम्यान, राष्ट्रवादीच्या तीन पैकी दोन नगरसेवक फुटल्याचे स्पष्ट झाले. पवित्रा केरीपाळे व संगीता हारगे यांनी निवडणूकीकडे पाठ फिरवली. राष्ट्रवादीतील ही फूट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना जोरदार धक्का मानला जात आहे. वर्षभरापुर्वीच महापौर, उपमहापौर निवडीत काँग्रेस, राष्ट्रवादीने भाजपचे सहा नगरसेवक फोडून सत्ता मिळवली. पण स्थायी समितीवर भाजपला शह देण्यात पुन्हा एकदा आघाडीला अपयश आले.

ऍमेझॉन प्राइमचा पहिला भारतीय सिनेमा प्रदर्शित होणार, धकधक गर्ल मुख्य भूमिकेत दिसणार

तर राष्ट्रवादीने आपल्याला दिलेला शब्द पूर्ण केला नाही, तसेच आघाडी धर्माचे पालन केले नाही. दगाफटका केला असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्व सदस्य सभागृहात असते, तर नक्की आम्ही चमत्कार केला असता. मात्र, राष्ट्रवादीचे सदस्य गैरहजर राहिल्याने आम्ही काहीच करू शकलो नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांनी दिली.

वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प राज्याला देऊ, उदय सामंतांचे आवाहान

Latest Posts

Don't Miss