Saturday, July 27, 2024

Latest Posts

Breaking, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज करणार भाजपमध्ये प्रवेश करणार

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा (Former Maharashtra CM Ashok Chavan resigns from Congress) दिला होता.

सध्या सगळीकडे आगामी लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) वारे हे वाहत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. सर्व पक्ष ऍक्शन मोड मध्ये आल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच महाविकास आघाडीनंही (Maha Vikas Aghadi) महायुतीविरोधात एकत्र येत आगामी लोकसभेसाठी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे निवडणुकीला अवघे काहीच महिने राहिलेले असताना काँग्रेसच्या गटातून अनेक मोठ्या मोठ्या घडामोडी या समोर येत आहेत. काल दिनांक १२ फेब्रुवारी रोजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला. तर आज अशोक चव्हाण हे भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा (Former Maharashtra CM Ashok Chavan resigns from Congress) दिला होता. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले होते. दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करु, असे त्यांनी सांगितलं होतं. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात असल्याचं वक्तव्य केले होते. आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी भाजपच्या कार्यलयात जय्यत तयारी सुरु आहे.

तर आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज दुपारी १२ वाजता अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होणार आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज हा पक्षप्रवेश होणार आहे. त्यानंतर साडे १२ वाजता चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे.

हे ही वाचा: 

पॅराग्लायडिंगच्या पंढरीत रंगणार साहसी क्रीडाप्रकाराचा मेळा

छोट्या पडद्यावरील‘आई कुठे काय करते’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप ? चर्चा सुरु

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss