Wednesday, February 28, 2024

Latest Posts

चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा

ठाकरे गटाच्या मोर्चाच्या अनुषंगाने भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार आसूड ओढला

मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या वतीने धारावीच्या प्रश्नांसाठी धारावी बचाओ मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चामध्ये स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे.

ठाकरे गटाच्या मोर्चाच्या अनुषंगाने भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार आसूड ओढला. उद्धव ठाकरेंना संधी असतानाही त्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून भाजपवर केला. त्यावर बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची हिंमत कुणाच्या बापात नाही, कोणत्याही पक्षात ती हिंमत नाही. जनतेला कन्फ्युज करण्यासाठी हे बोललं जात आहे.कधी धारावीचा विकास केला नाही. आता आमचं सरकार काम करण्याचा प्रयत्न करत आहे, तर ते विरोध करत आहेत.


मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून भाजपवर केला. त्यावर बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची हिंमत कुणाच्या बापात नाही, कोणत्याही पक्षात ती हिंमत नाही. जनतेला कन्फ्युज करण्यासाठी हे बोललं जात आहे. ”धारावी पुनर्विकास प्रकल्प उद्धव ठाकरेंना करता आला असता, परंतु त्यांना ते करता आलं नाही… आता मात्र मोर्चा काढत आहेत. धारावीकरांचं जीवनमान उंचावणार आहे, अशावेळी उद्धव ठाकरे विरोध करतायत” असं म्हणत बावनकुळे यांनी ठाकरेंच्या आंदोलनावर जोरदार टीका केली.

हे ही वाचा:

 

Latest Posts

Don't Miss