Saturday, March 2, 2024

Latest Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सत्तेत आल्यापासून बळीराजाला ४४ हजार २७८ कोटींची विक्रमी मदत

सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन हे सुरु आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती.

सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन हे सुरु आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती. या संदर्भात बोलत असताना आज विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्दे हे मांडले आहेत.

या संदर्भात बोलत असताना एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात अतिवृष्टी झाली होती. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने काढून घेतला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून सरकारने हजारो कोटींची मदत केल्याचं विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. भरपाईचा आकडा सांगितला त्यासोबतच सर्व हिशोब दिला आहे. जुलै,2022पासून म्हणजे गेल्या फक्त 18 महिन्यात शेतकऱ्यांसाठी जो भरीव निधी खर्च करीत आहोत तो मी सांगू इच्छितो. मदत व पुनर्वसन विभागाकडून 14 हजार 891 कोटी रुपये, कृषि विभागाकडून 15 हजार 40 कोटी रुपये, पशुसंवर्धन 243कोटी, सहकार 5 हजार 190 कोटी, पणन 5 हजार 114 कोटी, अन्न व नागरी पुरवठा 3 हजार 800 कोटी अशा रीतीनं एकूण 44हजार कोटीपेक्षा जास्त खर्च आम्ही करत असल्याचं शिंदेंनी सांगितलं.

 

जगाचा पोशिंदा मायबाप शेतकरी मातीत सोनं पिकवतो. मी देखील शेतकऱ्याचा मुलग आहे, पिकाचं नुकसान झाल्यावर काय अवस्था होते याची मला जाणीव होते. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला होता. सत्ताधारी आणि असो किंवा विरोधक सर्वांना शेतकऱ्यांची काळजी आहे. गेल्या दीड वर्षात म्हणजे सत्तेत आल्यापासून विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला 44 हजार 278 कोटींची विक्रमी मदत केली असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी NDRF च्या दरात दुप्पट दराने मदत करण्याचा निर्णय घेतला. दोन हेक्टर ऐवजी मर्यादा तीन हेक्टर केली, जिरायतीसाठी 13,600, बागायतीसाठी 27,000 आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 प्रतिहेक्टर या दराने भरपाई दिली आहे. राज्य सरकारने वाढीव दराने मदत करण्याचा निर्णय घेत 1851 कोटींचा लाभ शेतकऱ्यांना देत असल्याचं शिंदेंनी सांगितलं.

हे ही वाचा:

 “संपूर्ण विश्वातील सर्वात महान मनुष्य,रितेशच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाची खास पोस्ट

दरवर्षी का होतो कांद्याचा वांदा? निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना किती बसतो फटका? जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss