Saturday, July 27, 2024

Latest Posts

काँग्रेस नेते एकनाथ खडसेंची राज्य सरकारवर टीका

मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. हे तीन रंगाचे सरकार आहे. या सरकारची परिस्थिती दोन बायका आणि फजिती ऐका अशी आहे, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी सरकारवर टीका केली आहे.

राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चोरी, दरोडा आणि इतर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. या सरकारमध्ये काय चाललंय? हे तीन रंगाचे हे सरकार आहे. या सरकारची परिस्थिती म्हणजे दोन बायका आणि फजिती ऐका अशी आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले, कुणाकुणाचे काय भाग्य फुलते. रिक्षावाला मुख्यमंत्री होतो तर टपरीवाला मंत्री होतो. मुक्ताईनगरचे आमदार ५० कोटी घेऊन ओके होतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy Chief Minister Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), मंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांवर खडसेंनी टीका केली आहे. सरकारमधील बेरोजगारी कमी झाली. मात्र,राज्यातील बेरोजगारांची संख्या वाढली, असे एकनाथ खडसे म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ३५ वर्षांपासून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या विरोधात राजकारण करणारा शरद पवारांचा शिलेदार भाजपात सामील झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संजय गरुड (Sanjay Garud) यांनी पक्ष सभासदत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

हे ही वाचा:

सांगली बाजारपेठेत मुहूर्ताच्या हळदीला मोठी मागणी, हळदीच्या दरात वाढ

राजकारण करू पाहणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार? – Aaditya Thackeray

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss