Saturday, July 27, 2024

Latest Posts

दीपक केसरकर म्हणाले, कोकणातील फायटर नेत्याचा पराभव केल्याचं आजही दुःख…

लोकसभा आणि राज्यसभा निवडणूका या अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

Deepak Kesarkar on Narayan Rane : लोकसभा आणि राज्यसभा निवडणूका या अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अश्यातच आता शालेय शिक्षण मंत्री (Cabinet Minister for Ministry of Education and Ministry) दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नारायण राणे यांच्याबाबत (Narayan Rane) एक वक्तव्य केले आहे. कोकणातील मोठ्या नेत्याचा पराभव केला याचं आजही दुःख आहे असं यावेळी ते म्हणाले आहेत.

विनायक राऊत यांना लोकसभेत निवडून आणण्यासाठी मदत केली आणि नारायण राणेंसारख्या कोकणातल्या एका मोठ्या नेत्याला पराभूत केलं, याचं आज सुद्धा दु:ख आहे. त्याची भरपाई म्हणून राणेंना पुन्हा निवडून आणण्यासाठी मला खारीचा वाटा उचलता आला तर मला आनंद होईल, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. नारायण राणेंसारखा फायटर नेता एकदा जरी खासदार झाला तर, खूप कायापालट करू शकतात. मात्र, विनायक राऊत यांना दोन वेळा खासदार करून काही उपयोग नाही, असं म्हणत केसरकरांनी विनायक राऊतांवर निशाणा साधला आहे. कोकणातील फायटर नेत्याचा पराभव केला याचं आजही दुःख असून नारायण राणेंना पुन्हा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विनायक राऊतांनी दीपक केसरकरांवर पलटवार केला आहे. ”दीपक केसरकर हे सत्तेसाठी लाचार झाले असल्याने नारायण राणे यांचे पाय चाटू लागले आहेत. एक वेळ अशी होती की, हेच केसरकर राणेंच्या दहशतवाद आणि दादागिरीची आरोळी ठोकत फिरत होते. हेच केसरकर आता राणेंचे पाय धुवत आहेत, अशी बोचरी टीका खासदार विनायक राऊत यांनी केसरकर यांच्यावर केली आहे. राणेंसारख्या बड्या नेत्याचा पराभव केल्याचं दुःख मला होतंय, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं होत यावर प्रतिक्रिया देताना खासदार विनायक राऊत बोलत होते.

हे ही वाचा:

भविष्यातील विजयाचं रणशिंग रायगडावरून फुंकलं जाणार- जयंत पाटील

लोकसभेसाठी आम्हाला जागा द्यावी हा आमचा आग्रह, आम्हाला सिरियसली घ्यावे – रामदास आठवले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss