Wednesday, February 28, 2024

Latest Posts

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली शरद पवारांवर टीका

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात अनेक वाद निर्माण झाले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात अनेक वाद निर्माण झाले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे अनेक ठिकाणी सभा घेत आहेत. मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवार यांचा असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. शरद पवारांना मराठा समाजाला कधी आरक्षण द्यायचेचं नव्हते. स्वत:च्या नेतेपदासाठी शरद पवारांनी समाजांना झुंझवत ठेवायचे आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शरद पवार यांच्या मनात असतं तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिले असते असे फडणवीस म्हणाले. त्यांना कधी मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हतं. त्यांना फक्त दोन समाजाला झुंझवत ठेवायचे होते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केली आहे. मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शरद पवार यांच्या मनात असतं तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिले असते असे फडणवीस म्हणाले. त्यांना कधी मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हतं. त्यांना फक्त दोन समाजाला झुंझवत ठेवायचे होते, असे म्हणत शरद पवारांवर टीका केली आहे.

महाराष्ट्रात ज्यावेळी आपलं सरकर होतं त्यावेळी आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. ते सर्वोच्च न्यायालयात आपल्या सरकारच्या काळत टिकपलं होतं अस फडणवीस म्हणाले. आत्तासुद्दा आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र, हे आरक्षण देताना ओबीसींवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. काहीही झालं तरी चालेल, च्या आरक्षणावर संकट येणार नाही हे भाजपचे आश्वासन असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. विरोधी पक्षांना देशाची, समाजाची चिंता नाही तर त्यांना त्यांच्या परिवाराची चिंता असल्याचे फडणवीस म्हणाले. आज आपण पाहत आहोत ते रोज भूमिका बदलत असल्याचे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना फक्त सत्तेच्या राजकारणात आपलं अस्तित्व टिकवण्याची चिंता असल्याचे, फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

धारावी पुनर्विकासात टीडीआर घोटाळ प्रकरणी , राऊतांच्या आरोपांवर शेलारांचं प्रत्युत्तर

मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केली छगन भुजबळांवर केली टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss