मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. धारावीकरांच्या मागण्यांसाठी ठाकरे गटाने आज मोर्चाचे आयोजन केले आहे. तसंच, आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपा आणि अदानींवर घणाघात केला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वांत मोठा टीडीआर प्रकल्प असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. त्यांच्या या टीकेवर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्रातील “मुंबईत उबाठाबाबत एकच चर्चा, धारावीतून निकालेंगे मातोश्री टू का खर्चा”, अशी काव्यात्मक टीका आशिष शेलार यांनी केली. “हा हसवणूक आणि फसवणुकीचा धंदा आहे. ५०० फुटांची घरे हवी होती मग उद्धव मुख्यमंत्री होतात तेव्हा टेंडरमध्ये अट घालायची होती. तेव्हा का नाही घातली? आज तुम्हाला उपरती का झाली? मुंबईला आणि राज्याला काही विकासातून मिळालं की ज्यांची पोटदुखी होते ते म्हणजे उबाठा. त्यामुळे त्यांच्या पोटदुखीचा हा कार्यक्रम आहे”, असा पलटवार आशिष शेलारांनी केला आहे. संजय राऊत यांनी हा प्रतिउत्तर केलं आहे. १९९२ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील स्फोटके उतरवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शेखाडी आणि दिघी या किनाऱ्यांचा वापर केला गेला होता. आता मेफेड्रोन परदेशात पाठविण्यासाठी तस्करांनी समुद्री मार्गाचा अवलंब केल्याची बाब समोर आली. दोन महिन्यापुर्वी नौसेना, तटरक्षक दल, पोलीस आणि कस्टम्स यांचा डोळा चूकवून चरसची पाकीटे किनाऱ्यावर लागली. ही पाकीटे समुद्र किनाऱ्यावर कशी आली याचा शोध लागलेला नाही. किनाऱ्यावर पाहून आलेल्या चरसची सध्या विक्री आणि सेवन सुरू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे या घटनांची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.
मुंबई, नवी मुंबई आणि पुणे परिसरात हायप्रोफाईल पार्ट्यांमध्ये मेफेड्रॉनला मागणी असते, मेफेड्रोन वितरण करणे सोपे जावे यासाठी मुंबई पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खोपोलीची आरोपींनी निवड केली होती. आणि यासाठीच खोपोली परीसरात मेफेड्रॉन निर्मितीचा कारखाना उभारला होता. नव वर्ष स्वागत पार्ट्यामध्ये हे मेफेड्रॉन वितरणाचा आरोपींचा मानस होता अशी माहिती आता समोर येत आहे. खोपोली मेफेड्रॉन प्रकरणाच्या सर्व बाजू तपासल्या जात आहेत. आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींनी मेफेड्रॉन परदेशातही पाठवल्याचे समोर आले आहे. त्याही दृष्टीने तपास सुरू आहे.