spot_img
Friday, February 23, 2024
spot_img

Latest Posts

मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केली छगन भुजबळांवर केली टीका

मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे चौथ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौरा करत आहेत. त्यातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मराठा समाजाला ओबीसींमधून सरसकट आरक्षण यावरून अनेक वाद वाढत चालले आहेत. हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. तसेच आज पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. भुजबळांचा एडपट असा उल्लेख करत, माझ्या नादी लागू नको, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, तुम्ही अनेकांना अंगावर घेतले असेल. मी देवेंद्र फडणवीस आणि अजित दादाला सांगितलं आहे की, भुजबळ तुम्हाला अडचणीत आणतील. भुजबळ यांनी त्यांच्या वाटेचं खावं, उगाच झाड की पत्ती वगैरे म्हणून शेर शायरी करू नयेत. काहीही बोलतात, त्यांनी माझ्या नादी लागू नयेत. तर, भुजबळ यांनी खोटं बोलून स्वतःची सुरक्षा वाढवून घेतली असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. तसेच सरसकट गुन्हे मागे घेता येणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे, त्यावर मनोज जरांगे यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. फडणवीस यांनी गुन्हे मागे घेऊ असे सांगितले होते. सरसकट गुन्हे मागे घेऊ असेही ते म्हणाले होते. त्यामुळे त्यांना गुन्हे मागे घ्यावेच लागेल. जे निष्पाप आहे त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून आतमध्ये टाकले जात आहे. मराठा आंदोलन बदनाम करण्यासाठी हे घडवल गेले आहे. आज तुम्ही अन्याय करा, पुढे आम्ही ते लक्षात ठेवणार आहोत. आम्हाला आशा आहे की, तुम्ही गुन्हे मागे घेणार. ज्यांनी काही केलं असेल त्यांना आमचे समर्थन नाहीच. पण, गोरगरिबांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठा समाजावर असा अन्याय करू नका. त्यामुळे आणखीनही फडणवीसांनी विचारपूर्वक बोलावं, मराठा समाजाबद्दल चांगले शब्द वापरावे. तुम्ही कसा अन्याय करत आहात हे मराठ्यांनी मनात कोरून ठेवले आहे, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.

देशात फक्त मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे खऱ्याअर्थाने ओबीसीमध्ये मराठे आहोत. आम्ही तुमच्या बाबतीत कधीच काही म्हंटले नाही, फक्त जळू नका. याला (छगन भुजबळ) कितीही वळवळ करू द्या, त्याचं सरकारने एकु नयेत. खोट्या केसेस करून नाराजी वाढवू नका. यांना संताजी-धनाजी सारखे मी आणि मराठा समाज पाण्यात दिसू लागलो, त्याला मी काय करणार, असेही मनोज जरांगे म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

POLITICS: निवडणूक फक्त भाजपासाठी नव्हे, तर भारतासाठी, काय म्हणाले DEVENDRA FADNAVIS?

परळीतील अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉपीचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss