Monday, May 20, 2024

Latest Posts

मला लाईव्ह मॅच पाहायला आवडते, फिक्स मॅच मी पाहत नाही ; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राउत यांनी घेतलेली मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. या मुलाखतीवर व उद्धव ठाकरेंवर भाजपा नेत्यान कडून टीका केली जात आहे. त्याच बरोबर शिवसेनेतील काही नेते या मुलाखतीची पाठराखण करत आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाष्य करणे टाळले असले तरी जाता जाता म्हणाले, ” मला लाईव्ह मॅच पाहायला आवडते, फिक्स मॅच मी पाहत नाही” असा टोला देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना लगावला आहे. व पुढे प्रतिक्रिया देणे टाळले.

यावेळी फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराजांच्या वढू येथील नियोजित स्मारकाला स्थगिती दिल्याचा केलेला आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले की, “संभाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भातील कामांना आमच्या सरकारने स्थगिती दिल्याचा आरोप करताना दादांसारख्या माणसाने फाईलवर काय लिहिलंय हे पाहिले जे होते. मी स्वत:च्या हस्ताक्षरात फाईलवर लिहिलय की, या कामाला स्थगिती देणे योग्य होणार नाही. उलट या संदर्भात काय काय कामे घेतली आहेत. त्यासंदर्भातील सादरीकरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर करावे व त्यात काही कामे राहिली असतील तर त्याचाही समावेश करण्यात येईल”, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : 

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, शिवसेनेने केलेला अर्ज सर्वोच्च न्यायलयाने स्विकारला

Latest Posts

Don't Miss