spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

आंतरवली सराटीमध्ये झालेल्या लाठीमारावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

काही महिन्यांपूर्वी आंतरवली सराटीमध्ये मराठा आंदोलक उपोषणासाठी बसले होते. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला होता.

काही महिन्यांपूर्वी आंतरवली सराटीमध्ये मराठा आंदोलक उपोषणासाठी बसले होते. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला होता. यामध्ये अनेक पोलीस आणि आंदोलक जखमी झाले होते. त्यानंतर मराठा आंदोलनाला एक वेगळेच वळण लागले. आंतरवलीमध्ये झालेल्या लाठीमारामुळे मराठा आंदोलन चिघळले, असा आरोप विरोधकांनी केला आहे. विधानसभेच्या अधिवेशनात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि आंदोलक यांच्यामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आंतरवली सराटीमध्ये झालेल्या लाठीमाराबद्दल उत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे मराठा आंदोलन चिघळले असा आरोप विरोधकांनी केला आहे. हे सर्व लाठीचार्जमुळे झाले असेल पण लाठीचार्ज का झाला? आता याचे षडयंत्र बाहेर येत आहे. आता हे सर्व लक्षात आलं आहे. मनोज जरांगेंना रात्री जाऊन परत आणणारे कोण आहे? कोणाकडे बैठक झाली? हे आरोप करण्यात आले आहेत. कोणी दगडफेक करायला सांगितली? पोलीस आपले नाहीत का? आपल्याला पोलिसांनी मारायचं आणि आपण गप्प बसायचं का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

अधिवेशनातील गोंधळानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वक्तव्य केले आहे. त्यानंतर मनोज जरांगे म्हणाले, त्यांना माहित आहे मी निष्ठावान आहे. हरामखोर आहे, म्हणून ते असे षडयंत्र रचत आहेत. देवेंद्र फडणवीस मला मारायला तयार आहेत. मी सुद्धा हसत मरायला तयार आहे. असं मरण यायला भाग्य लागतं, मी मरण पत्करायला तयार आहे. मी हे सर्व पहिल्यापासूनच सांगत आहे. शांततेमध्ये आंदोलन करणारा आमचा समाज आहे. काल मी तेच सांगितलं होत मी एकटा जात आहे कोणीही उद्रेक करायचा नाही. त्याला महाराष्ट्र बेचिराख करायचा आहे. आपण हे सगळं होऊ द्यायच नाही. मी तुम्हाला भेटण्यासाठी येतो नाही येऊ दिलं तर जेलमधून तुमच्यासोबत आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

Latest Posts

Don't Miss