शिरूर लोकसभेच्या जागेवरून अजित पवार आणि जयंत पाटील यांची वेगवेगळी मते

सध्याच्या राजकारणात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षामधून निवडणूक २०२४ कडे सगळ्याच पक्षाचे लक्ष लागून राहिले आहे.

शिरूर लोकसभेच्या जागेवरून अजित पवार आणि जयंत पाटील यांची वेगवेगळी मते

सध्याच्या राजकारणात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षामधून निवडणूक २०२४ कडे सगळ्याच पक्षाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यात आता शिरूरच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचे चित्र बघायला मिळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवार कोणाचा असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. त्याचबरोबर शिरूर मतदार संघात उमीदवार कणाला बनावटीचा याबाद्द्दल पक्ष साशंक आहे. मागच्या काही दिवसांपासून शिरुर लोकसभा मतदारसंघावरुन उलटसुलट चर्चा सुरु आहेत. तसेच अभिनेते आणि आता राजकारणातले अमोल कोल्हे यांना डावलून पक्ष दुसऱ्या कुणालातरी संधी देणार आहे, असं बोललं जात आहे. यापूर्वीही अजित पवारांनी याबाबत भाष्य केलं होतं. आजदेखील ते शिरुरच्या जागेबद्दल बोलले आहेत.

राजकारणात आता नवीन दावेदार तयार होताना दिसत आहे. नेहमी शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांचे नाव दिले जाते परंतु आता निवडणूक लढविण्यासाठी माजी आमदार विलास लांडे यांनी पुन्हा दावेदार बनण्यास इच्छा वर्तवली जात आहे. तसेच, विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही ‘शर्यत अजून संपलेली नाही,’ असे म्हणत आपण अजूनही उमेदवारीसाठी इच्छूक असल्याचे स्पष्ट केले आहे, त्याचबरोबच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जो निर्णय देतील, तो आपल्याला मान्य असेल, असेही त्यांनी म्हटलं होतं. शेवटी अमोल कोल्हे यांनी पक्षस्ट्रेस्टींच्या मनाचा आणि त्याच्या विचारांचा आदर करून त्यांच्या कडून जो निर्णय घेतला जाईल तो मला मान्य असेल असेही अमोल कोल्हे यांनी मत स्पष्ट केले आहे. यावर प्रसार माध्यमांकडून अजित पवार याना विचारणा केली असता, विलास लांडे हे एकेकाळचे आमचे आमदार आहेत. त्यांना आम्ही महापौर केलं होतं, त्यांना खासदारकीची उमेदवारीही दिली होती. त्यावेळी त्यांना अपशय आले होते. आता कदचित त्यांनी अधिक जोमाने काम करण्यास सुरवात केली असेल त्यामुळे त्यांनी या शिरूर निवडणुकीत उडी मारण्याचे धाडस केले असावे असे मत अजित पवार यांनी मांडले.

पत्रकारांकडून शिरूर निवडणुकी संबंधी अजित पवार याना विचारणा केली असता, ज्यांच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट असेल त्यांना संधी मिळेल. मग तो नवीन असेल नाहीतर जुना. आम्ही पक्षाचे सर्व नेते बसून शिरुरमधील निवडणुकी संदर्भात मार्ग काढू. असे मत स्पष्ट केले आहे. ज्या जागा महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीच्या वाट्याला येतील त्या सर्व जागांच्या बाबतीत तोडीस तोड उमेदवार देऊ,असं देखील अजित पवार म्हणाले.त्याचा दरम्यान जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आहेत . त्यावेळीच प्रसारमाध्यमांकडून जयंत पाटील यांना विचारले असता, सोलापूर येथे बोलतांना जयंत पाटील यांनी शिरुरमध्ये दुसऱ्या कुणाच्याही नावाचा विचार नाही, असं म्हटलं होतं. एकूणच काय तर शिरुरच्या जागेवरुन सध्या जोरदार वाद निर्माण झाले आहेत यात काही शंकाच नाही. एकीकडे अजित पवार बसून मार्ग काढू असं म्हणत आहेत तर दुसरीकडे जयंत पाटील अमोल कोल्हेंच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे येणारी शिरूर येथील निवडणुकीच्या राजकारणात कोणते रंग भरते हे पाहणे महत्वाचे ठरत आहे.

हे ही वाचा : 

Amit Shah यांनी घेतली कुस्तीपटूंची भेट, कुस्तीपटूंचा संघर्ष आता संपणार का?

World Test Championship Final मध्ये द मेन इन ब्लू भिडणार बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version