Saturday, July 27, 2024

Latest Posts

चर्चाना आलं उधाण!,शरद पवार गटाच्या बड्या नेत्याने घेतली अजित पवार यांची भेट

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अभूतपूर्व बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार हे सातत्याने चर्चेत असतात.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अभूतपूर्व बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार हे सातत्याने चर्चेत असतात. या बंडानंतर अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ही मिळाले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार असे पक्षाचे नाव घेतले. त्यांना तुतारी हे पक्ष चिन्ह मिळाले. त्याचे अनावरण आज होणार आहे. तर आता पुढे लोकसभा आणि राज्यसभा यांच्या निवडणूक या होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे जोरदार कमला लागले आहेत. अश्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान एक मोठी घडामोड घडल्याचं सध्या सर्वांच्या निदर्शनास येत आहे.

तर आज पुण्यामध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. तर सकाळी सात वाजल्यापासून पुण्यातील सर्कीट हाऊसमध्ये बैठका सुरु आहेत. त्याचवेळी शरद पवार गटाचे बडे नेते राजेश टोपे अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दारआड चर्चा झाली.

आमदार रोहित पवार कालवा समितीच्या बैठकीला आले आहे. सुप्रिया सुळे या बैठकीला आल्या आहेत. त्यांनी पाण्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आल्याचे सांगितले. पाण्यासंदर्भात ही बैठक आहे. परंतु अजित पवार, रोहित पवार यांच्यात काय चर्चा होते का? हे ही समजणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार आणि अजित पवार यांच्यात चांगला कलगीतुरा रंगला आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत ही बैठक चालणार आहे.

 

अजित पवार आणि राजेश टोपे यांची बैठक सर्कीट हाऊसमध्ये बंद दाराआड झाली. या चर्चेच्या दरम्यान अन्य कोणी उपस्थित नव्हते. राजेश टोपे अजित पवार यांना भेटून सर्किट हाऊस मधून निघाले. त्यानंतर राजेश टोपे यांना माध्यमांनी गाठले. त्यावेळी त्यांनी चर्चेचा तपशील जाहीर करण्यास नकार दिला. यामुळे या भेटीत काय खलबंत झाले त्याची माहिती नाही.

हे ही वाचा:

गौरी खानचं नव्या क्षेत्रात पदार्पण,सुरु केलं मुंबईत स्वतःचं पहिलं रेस्टॉरंट

विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी Amit Thackeray यांचा धडक मोर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss