Saturday, July 27, 2024

Latest Posts

Exclusive : Devendra Fadnavis यांना कोणी Disturb केलंय, Manoj Jarange Patil यांनी की BJP MLA नी?

आज दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ पासून मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपाभोवतीच देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सर्वच आमदार अडकून पडल्याचे चित्र आपल्याला सध्या दिसत आहे.

आज दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ पासून मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपाभोवतीच देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सर्वच आमदार अडकून पडल्याचे चित्र आपल्याला सध्या दिसत आहे. निवडणुकांच्याआधी जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याचं वाटत आहे. परंतु, या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं देखील समोर येत आहे. जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा खराब केली आहे. परंतु, देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार समर्थन अजूनही पक्षाकडून झालेले नाही. देवेंद्र फडणवीस हे पक्षात खरचं एकटे पडले का? देवेंद्र फडणवीस यांची जी राजकीय चिडचिड चालू झाली आहे त्याला नेमकी काय कारणं आहेत?

आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत भाजपचे ७०-७२ आमदार उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांना राज्यात मोठे नेते म्हणून ओळखले जाते. परंतु, हेच फडणवीस आता पक्षात एकटे पडल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. याचं कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या शरद पवारांच्या पक्षातील असुद्या किंवा इतर पक्षामधील. पवार पक्ष चालवायचे अश्या पद्धतीचं एक स्वरूप एकदंरीत होते. ९० च्या दशकात गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवरांच्या प्रतिमेविरोधात एक जंग छेडले होते, परंतु त्यामध्ये पवार यांचा काही डॅमेज झाला नाही. परंतु त्यापेक्षा जास्त डॅमेज देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत आणि एकंदरीत ते खलनायकाच्या भूमिकेत असल्याचं दिसून येत आहेत. परंतु जरांगे पाटील यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नाहीत. पण हे सर्व होत असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पक्षातून ज्या स्वरूपाचा आवाज उठायला हवा होता तो मात्र उठला नाही. आज आमदारांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणाची नाराजी दिसली आहे आणि त्याप्रमाणे कुजबुज होताना ही दिसून आले आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नेतेपण विशिष्ट कोंडाळ्याच्या भोवती अडकल्याचे दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस हे काही विशिष्ट लोकांनाच आपल्या गाडीत घेतात, काही नेत्यांचं ऐकतात तर मोजक्याच आमदारांना प्रतिसाद देत असतात, अशी तक्रार आज सर्व आमदारांमध्ये जाणवली आहे. देवेंद्र फडणवीस यांना आता जे भाजपचे नेते आहेत, त्यापेक्षा मोठं व्हायचं असेल तर त्यांना आपल्या अवतीभोवती असलेला चक्रव्यूव्ह आहे, त्याला सर्वात आधी भेदून सर्व आमदारांचा त्यांना व्हावं लागेल. परंतु, त्यांना जर ते जमलं नाही तर रहस्य स्वरूपाचं चित्र वारंवार आपल्याला दिसत राहील.

जरांगे पाटील यांना ढील देण्यामध्ये आपल्या पक्षाचा किंवा काही निर्णयाचा हात होता असं सध्या काही आमदारांचे मत आहे. ज्यावेळी ते ब्राह्मण – ब्राह्मण अश्या विशिष्ट जातीवर हल्ला करत होते किंवा देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत होते. त्यावेळी, पक्षाच्या आमदारांनी, नेत्यांनी किंवा प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केलं, कारण मराठा समाज हा आपल्यावर उलटायला नको. परंतु याचा अत्यंत चुकीचा अर्थ मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आणि त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची जी काही बदनामी सुरु केली ती बदनामी भाजपसारख्या पक्षाला मुळीच परवडणारी नाही. परंतु आता वेळ निघून गेली आहे. परंतु निघून गेलेली वेळ योग्य पद्धतीने साधायची असेल तर देवेंद्र फडणवीस यांना अश्याच काही बैठकांमधून आमदार आपले किती आहेत आणि आपण आमदारांचे किती आहोत हे दाखवून द्यावं लागेल. आता देवेंद्र फडणवीस यांना आपली प्रतिमा चांगली करायची असेल तर, त्यांना अत्यंत ठोस पावलं उचलावी लागणार आहेत.

हे ही वाचा:

Manoj Jarange Patil यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्यांची प्रतिक्रिया म्हणाले…

सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही; जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss