Saturday, July 27, 2024

Latest Posts

Exclusive :रविंद्र वायकरांवर पक्ष सोडायला कोणी दबाव आणला? सेनानेत्याचा Political Encounter!

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी २९ जून २०२२ ला फेसबुकद्वारे आपल्या विधिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी २९ जून २०२२ ला फेसबुकद्वारे आपल्या विधिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा देखील राजीनामा दिला. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर विधिमंडळाचा राजीनामा देण्याचा विसर पडलेले आणि विधानपरिषदेचे अध्यक्ष असलेले उद्धव ठाकरे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी सभागृहात आले होते. विधानपरिषदेतील सभागृहाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरु होता. त्यावेळेस तेथील लिफ्टमध्ये भाजपचे नेते आणि आमदार देवेंद्र फडणवीसांचे राजकीय हनुमान प्रसाद लाड हे उपस्थित होते. ज्या लिफ्टमध्ये प्रसाद लाड यांचा प्रवास सुरु होता त्याच लिफ्टमध्ये जागा आहे, असे उद्धव ठाकरे यांना प्रसाद लाड यांनी सांगितले. त्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले हे आपण समजून घेऊया.

माजी मंत्री आणि ईडीच्या कारवाईमध्ये असलेले शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांचे जिवश्चकंठश्च असलेले रविंद्र दत्ताराम वायकर हे शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणार ही बातमी मी आपल्याला सांगितली होती. पण अनेकांचा यावर विश्वास नव्हता. कारण वायकर हे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे आहेत. त्यांचे पक्षीय सबंध, त्यांचे कौटुंबिक संबंध, त्यांचे व्यावसायिक सबंध आणि वायकरांची मातोश्रीमध्ये जी उठबस होती ती सगळ्यांचं माहिती आहे. मुंबईतल्या राजकारणातलं एक मोठं नाव म्हणून रविंद्र वायकर यांच्याकडे पाहिले जाते. त्या वायकरांच्या जाण्याची किंवा शिवसेना सोडण्याची, त्यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याची पहिली बातमी Time Maharashtra ने दिली. त्यानंतर अनेक नेत्यांचे Time Maharashtra ला फोन आले. पण एक गंमत म्हणजे वायकरांनी फोन केलेला नाही. बातमी जर चुकीची असती तर वायकरांनी फोन केला असता. कारण, अश्याच स्वरूपाची एक बातमी Time Maharashtra चे संपादक राजेश कोचरेकर यांनी एका जुन्या वर्तमानपत्रात असताना कव्हर केली होती. ती बातमी होती १९ बंगल्यांच्या संदर्भातील. त्याच बातमीची क्लिप घेऊन वायकर यांनी न्यायालयामध्ये आपली बाजू मांडली होती. मात्र रविंद्र वायकर यावेळेस बातमीच्या नादाला लागले नाहीत. याचा अर्थ असा की, ही बातमी १०० टक्के खरी आहे. आज ज्यावेळेस प्रसाद लाड उद्धव ठाकरे यांना आपल्या लिफ्टमध्ये बोलवत होते, तेव्हा प्रसाद लाड म्हणाले, ‘या या उद्धवजी आतमध्ये खूप जागा आहे. आम्ही तुमची वाट बघतो. तुम्ही लिफ्टमध्ये सामावू शकाल. आम्ही तुमची वाट बघतो’. या विधानावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मला कसली लिफ्टमध्ये जागा देताय, तुम्ही तर माझा पूर्ण पक्ष रिकामा केला’. उद्धव ठाकरेंनी दिलेलं हे उत्तर हे त्यांच्या नेहमीच्या उध्दवी बाण्याला साजेसे नव्हतं. हा निरागसपणा त्यांच्या उत्तरातून दिसून आला. याचे कारण म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून उद्धव ठाकरे यांचा पक्ष पूर्ण रिकामा केला. अजूनही शिवसेनेतील नेते मंडळी सुधारत नाहीत.

अनेक महिलांवर अश्लाग्य पद्धतीचे आरोप केले जात आहेत. वेगवेगळ्या पुरुष पदाधिकाऱ्यांसोबत अत्यंत हिडीसपणे त्यांची नाव जोडली जात आहेत. नुकत्याच शैला बोडखे या विदर्भातील शिवसेनेच्या नेत्या होत्या, त्या आता निलीमा गोऱ्हे यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेल्या. अश्याच पद्धतीचा अनुभव मुंबई , ठाणे , नवी मुंबईमध्ये काम करणाऱ्या नेत्यांना येतोय. ही गोष्ट अत्यंत किळसवाणी आणि वाईट आरोप केले जात आहे हे आरोप पुरुष कार्यकर्ते करत नसून महिला पदाधिकारी करत आहेत. हे खरं आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष रिकामा होत आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच कबूल केलं आहे. हे उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या इमारतीमध्ये कबुल केले आहे. यांच्यासारखं दुसरं अजून काहीच असू शकत नाही. हे सगळं होत असताना अवघ्या काही वेळात किंवा अवघ्या काही तासात रवींद्र वायकर शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार आहेत. वायकरानी आजपर्यंत अनेकांच्या राजकीय खटयाखडी दूर केल्या आहेत. आणि त्याचं वायकरांवर नियती सूड उगवत आहे. ज्या वेळेस ईडीने रविंद्र वायकर यांच्यावर कारवाई केली, तेव्हा वायकर यांच्या पत्नी, जावई, मेव्हणा सगळ्यांनी वायकरांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. वयाच्या या टप्प्यावर ईडीच्या तुरुंगात जाण्यापेक्षा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जावं असा विचार केला. शेवटी नाइलाजास्तव आणि तुरुंगाच्या भीतीने रविंद्र वायकरांना शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याची वेळ आलेली आहे. येत्या काही तासात,अवघ्या काही काळात वायकर हे शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाणार आहेत. रविंद्र वायकर यांचे एकनाथ शिंदे यांच्यासोबत राजकीय वाद होते. पण आता कदाचित नियती वायकरांचा सूड घेत आहे. आणि घेतलेला सूड उद्धव ठाकरे यांना पटला आहे. त्यामुळे त्यांनी तो प्रसाद लाड यांच्यासमोर बोलून दाखवला आहे की तुम्ही माझा पक्ष रिकामी केला आणि तुम्ही आता मला लिफ्टमध्ये कसली जागा देताय.

Latest Posts

Don't Miss