Saturday, July 27, 2024

Latest Posts

Eknath Khadse यांच्या आरोपानंतर Girish Mahajan यांची पहिली प्रतिक्रिया, खडसेंच्या डोक्यात बिघाड…

एकनाथ खडसे यांच्या आरोपांनंतर आता गिरीश महाजन यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) हस्तक सलीम कुत्ता (Salim Kutta) याची सध्या जोरदार चर्चा आहे. सलीम कुत्ता प्रकरणात (Salim Kutta) भाजपकडून शिवसेना ठाकरे गटावर टीका केली जात असताना आता खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे सलीम कुट्टा प्रकरणात राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात विधान परिषदेत बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजनांचे सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत फोटो दाखवत मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. एकनाथ खडसे यांच्या आरोपांनंतर आता गिरीश महाजन यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे.

एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) डोक्यात मानसिक बिघाड झाला आहे, यांना महसूल चोरीमुळे १३७ कोटी रुपये भरावे लागणार आहेत, राजकीय अस्तित्व संपलं आहे आणि त्यांच्याकडे पायात चप्पलही घालायला पैसे राहणार नाहीत असं प्रत्युत्तर राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिलं. गिरीश महाजन यांचे सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेमध्ये काही फोटो दाखवले होते. त्यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. गिरीश महाजन म्हणाले की, कुठेतरी पोटात दुखतंय, १३७ कोटी रुपयांचा दंड, भोसली एमआयडीसी जमीन प्रकरणी २७ कोटी दंड लागला आहे. त्यांची सर्व संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे आता यांच्या पायात चप्पलही घालायला पैसे राहणार नाहीत अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे खडसे बावचाळले आहेत. काही करून आपला सत्यानाश झाला, मग हा कसा वर चालला याचं दुःख त्यांना आहे.

पुढे गिरीश महाजन म्हणाले की, नऊ वर्षांपूर्वीचा फोटो दाखवून खडसे काय सांगतात? त्यावेळी कुंभमेळा होता, त्या निमित्ताने सर्व धर्मीय लोक उपस्थित होते. त्यावेळी मुस्लिम धर्मातील एका नेत्याच्या मुलाचे लग्न होतं. त्या लग्नाला २० ते २५ हजार लोक हजर होते. त्या लग्नाला सर्व नेते उपस्थित होते. त्यावेळचा कुठलातरी फोटो दाखवायचा आणि काहीही आरोप करायचं काम सुरू आहे. या फोटोमध्ये आपल्यासोबत दाऊदचे नातेवाईक असल्याचा आरोप करण्यात आले होते. त्यानंतर याचे सर्व डिटेल्स पोलिसांकडून मागवण्यात आले आणि आरोप चुकीचे असल्याचं स्पष्ट झालं होतं असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

 “संपूर्ण विश्वातील सर्वात महान मनुष्य,रितेशच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाची खास पोस्ट

दरवर्षी का होतो कांद्याचा वांदा? निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना किती बसतो फटका? जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss