Thursday, May 16, 2024

Latest Posts

तू तुझ्या बापाचं नाव किती लावतोस? नितीश राणेंचा संजय राऊतांना सवाल

संजय राऊतांनी केलेल्या टीकेला कडवट भाषेमध्ये नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे. नितेश राणे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, दुसऱ्यांचे बाप काढायचे तुझ्या बापाचं काय आहे असे वक्तव्य वापरायचं. तू तुझ्या बापाचं नाव किती लावतोस, कोणत्या बापाचं नाव लावतोस असे प्रश्न नितीश राणे यांनी संजय राऊतांना केला आहे. नेमके तू शिलोरेचं नाव लावतोस की मातोश्रीच नाव लावतोस याचे उत्तर जरा महाराष्ट्राला दे असे नितीश राणे म्हणाले. पुढे ते म्हणाले की, कोणाचे कुंकू लावून फिरतोस तू? स्वतः च्या बापाचा थानपत्ता नाही, स्वतः च्या बापाबद्दल बोलायचं नाही आणि मोठ्या मोठ्या बाता करायच्या बाप काढायचे म्हणून पहिले स्वतःच्या बापाचे नाव महाराष्ट्राला कळू दे आणि तुझा कोणता बाप आहे हे ही तू महाराष्ट्राला एकदा सांग असे कडवट भाषेत नितेश राणे यांनी राऊतांना उत्तर दिले आहे.

पुढे नितीश राणे म्हणाले की, संजय राऊत हे काय पहिल्या बोलत नाही त्यांना पहिल्या पासून ते कोणाचे बाप काढायचे कोणाच्या घरामध्ये भांडण लावायचे भावाभावा मध्ये क्लेश निर्माण करायचे. हेच या संजय राऊत ची काम, हाच त्याचा इतिहास आहे. संजय राऊत सारखी माणसं आपल्या घरामध्ये का घायची नाही याची उदाहरण मी आज तुम्हाला देणार आहे असे नितीश राणे म्हणाले. संजय राऊत हे फक्त भांडण लावायची काम करतात आता सुद्धा त्यांचा हाच कार्यक्रम सुरु आहे. आता ते पवार कुटूंबामध्ये सुद्धा भांडण लावण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे. एकीकडे अजित दादांच्या विरोधामध्ये बोलायचं तर दुसरीकडे शरद पवारांच्या बाजूने बोलायचं जेणेकरून एक संघ असलेला पवार कुटुंब त्याच्यामध्ये फूट कशी पाडायची हा यांचा आता कार्यक्रम सुरु आहे. यावर त्याला अजित दादांनी त्यांच्या भाषेमध्ये खडसावलं आहे आणि पवार साहेबानी सुद्धा त्याला त्याची लायकी दाखवली परंतु मुद्दा असा आहे की, पवार कुटूंबामध्ये सुद्धा हा भाडंण लावण्याची काम करत आहे असे नितीश राणे म्हणाले.

पुढे नितीश राणे म्हणाले की, कोरोना काळामध्ये आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यामध्ये वाद निर्माण करण्याच काम संजय राऊतांनी केलं होत. राऊतांमुळे आदित्य आणि तेजस यांच्यामध्ये युवासेना पदावरून वाद निर्माण केले होते. मातोश्री वर या दोन्ही भावांमध्ये भांडण सुरु होती. काही वेळासाठी तेजस ठाकरे कर्जतमध्ये त्याच्या फार्म हाऊस वर राहायला गेला होता या भांडणामुळे. ज्या मालकाचं मीठ खात आहे ज्या मालकाचं पगार खात आहे त्याच्याही घरामध्ये आग लावण्याची काम हा माणूस करत आहे. जेव्हा संजय राऊतांची खासदारकी रद्द करण्यात आली होती तेव्हा त्याने बाळासाहेबांच्या विरोधामध्ये सामनामध्ये अग्रलेख लिहिला होता. तेव्हा त्यांनी एक विधान केले होते की, मला खासदारकी दिली नाही ना थांब मी या बाप लेकाला पोहचवतो. बाप लेक म्हणजेच बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे. असे नितीश राणे म्हणाले.

पुढे नितीश राणे म्हणाले की, हा घरात घेण्याच्या लायकीचा माणूस नाही. दुसऱ्याचे बाप काढतो, दुसऱ्याचे पाय कुठे आहेत ते विचारतो तुझं अस्तित्व या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठे आहे? तू दुसऱ्याच्या घरामध्ये आग लावण्यापलीकडे काही ही करू शकत नाही. म्हणून मी उद्धव ठाकरेंना सांगेल की जर तुम्हाला दोन्ही मुलांना एकत्र ठेवायचे असेल तर पहिले या संजय राऊत ला घराच्या बाहेर काढा. मुंबईमधील गुंडाना बारसूत आणण्याचा डाव संजय राऊतांनी रचला होता असे नितीश राणे म्हणाले.

हे ही वाचा : 

“राज ठाकरे यांनी जसे त्यांच्या काकांवर लक्ष ठेवले तसे मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेल”, अजित पवारांचे प्रत्युत्तर

वरळीच्या पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्याचा मृत्यू

मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याचा विचारात असाल तर एकदा रेल्वेचे वेळापत्रक नक्की पहा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss