Saturday, July 27, 2024

Latest Posts

विनाकारणाच्या राजकीय कलगीतुऱ्यात मला रस नाही- Sushma Andhare

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा आज वाशिम जिल्ह्यात आली असून, त्यांच्या या यात्रेचं मोप, भर जहांगीर, येथे स्वागत करण्यात आले. त्यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मधील स्वश्रेष्ठत्वतेचा वाद शिगेला पोहचला आहे. मैं बडा की तू बडा हे दाखवण्यासाठी रस्सीखेच सुरू असून, गोळीबार ही धुसफूस नसून हे गॅंग वॉर आहे. शिंदे-फडणवीस यांच्यातला हा गँग वॉर आहे. या गॅंग वॉर मध्ये आपले गुंड पाळायचे असतात, तसे हे पाळले आहेत. हे लोकप्रतिनिधी नाही आहेत. हे गुंड पाळलेले आहेत. यांचे जळगाव मधील किशोर पाटील पत्रकाराला मारहाण करतात, आमदार संतोष बांगर हे अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण करतात आणि स्वतः मारहाण केल्याचं सांगतात. आमदार गीता जैन अभियंत्याला मारहाण करतात, आमदार संजय गायकवाड हे मंत्री छगन भुजबळ यांच्या बद्दल गलिच्छ भाषा वापरतात. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या समोरच त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्याला भाजप आमदार सुनील कांबळे मारहाण करतात, तर गणपत गायकवाड गोळीबार करून त्याचं समर्थन करतात, असे यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या.

जर पहिल्याच घटनेला कुठेतरी चाप लावला असता, तर हे घडलं नसतं. लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधी म्हणून काम न करू देता त्यांना गुंड म्हणून पाळण्याचा प्रघात इथे पडत असल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. मला मनोज जरांगे आणि राज ठाकरे यांच्या वादात पडायचं नाही. इथं महिलांचे, विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तलाठी भरती (Talathi Bharati) मध्ये २०० पैकी २१६ मार्क मिळाले तरी ती परीक्षा रद्द होत नाही. सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत. हे प्रश्न माझ्यासाठी महत्वाचे आहेत. विनाकारणाच्या राजकीय कलगीतुऱ्यात मला रस नसल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा: 

आमदारांनी गोळीबार करावा आणि तेही पोलीस स्टेशनमध्ये हे अत्यंत गंभीर – Jayant Patil

नाशिकमध्ये जय भवानी रोडवर गोळीबार, शहरात भीतीचे वातावरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss