Friday, May 17, 2024

Latest Posts

प्रत्येक मतदारसंघात ‘मी खासदार’ मोहीम अभियान राबवणार, मतदार संघात ३००ते ४००उमेदवार उतरवणार- बच्चू कडू

देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे.

देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. येत्या काही दिवसात देशभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यातच आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्रत्येक मतदार संघात लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) २०० पेक्षा जास्त उमेदवार उभे करण्यासाठी बैठका सुरु आहेत, तर दुसरीकडे माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी देखील अशीच काहीशी भूमिका घेतली आहे. प्रत्येक मतदारसंघात ‘मी खासदार’ या अभियानाअंतर्गत ३०० ते ४०० उमेदवार उभे करणार असल्याचे मंत्री बच्चू कडू म्हणाले आहेत. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे निवडणूक आयोगाची (Election Commission) पुन्हा एकदा चिंता वाढण्याची शक्यता आहे.

बच्चू कडू म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर आम्ही देखील तयारी करत आहोत. प्रत्येक मतदारसंघात ४०० ते ५०० उमेदवार उभे करायचे आहेत. त्यासाठी आम्ही बैठका देखील घेतल्या. यासाठी मी खासदार असे अभियान आम्ही राबवणार आहोत. आमचं बॅलेट आम्हाला पाहायला मिळत नाही, आमचं मत आम्ही कुणाला मारलं, कुठे गेलं, ते कुणाला मिळालं, कुणाला नाही मिळालं याचा मूलभूत अधिकारच ईव्हीएम मशीनने हिनावून घेतला आहे. आमचा तो अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, घरकुल मिळत नाही, शहर आणि गाव अशी वेगळी तफावत आहे. हे सर्व मुद्दे घेऊन ‘मी खासदार’ असं अभियान राबवणार, असे बच्चू कडू म्हणाले. महायुतीमध्ये छोट्या पक्षांना भाजप विचारत नाही. तशी त्यांना गरज वाटत नसेल. हा त्यांचा प्रश्न आहे ते आम्हाला विचारत नाहीत. त्यामुळे आम्ही देखील आता आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील मी काही विचारणार नाही. त्यांनी विचारलं तर मी सांगेन. महायुती हा आमच्या समोर पर्याय आहे. सध्या इकडचं नातं तुटलं तरच समोर जाऊ, असे बच्चू कडू म्हणाले.

सुरुवातीला दिल्लीमध्ये बैठक झाली होती. त्यानंतर आणखीन एक बैठक झाली त्या बैठकीला मी गेलो नव्हतो. मला असे वाटते की जेव्हा आपण एखादी निवडणूक लढतोय, त्यावेळी जसं आपण मतदारसंघात शेवटच्या माणसाला विचारतो, तशी भूमिका सध्या भाजपची दिसत नाही. त्यामुळे आम्हाला देखील त्यांची फार गरज वाटतं नाही. . महाराष्ट्रात देखील अनेक एनडीएच्या बैठका झाल्या आहेत, त्या बैठकांना आम्हला बोलावले नाही. काय ते उघड करू असं लपून-छपून करणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले.

हे ही वाचा:

भारत जोडो न्याय यात्रा धुळे मालेगावात दाखल, १७ मार्चला शिवाजी पार्कवर समारोप

Raj ना जे जमतं ते Uddhav यांना का जमत नाही? कालचा निष्ठावंत आज गद्दार कसा ? | Uddhav Thackeray

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss